2 मुलं-पत्नीला सोडून हिरोने केलं दुसरं लग्न, 6 महिन्यांची प्रेग्नंट आहे नवी बायको, सोशल मीडियावर खळबळ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
South Indian Actor Second Marriage : एका विवाहित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याने चक्क दुसरं लग्न केलं आहे. विशेष म्हणजे, लग्नाच्या वेळी त्याची दुसरी पत्नी सहा महिन्यांची गरोदर आहे.
advertisement
advertisement
या अभिनेत्याचं नाव आहे मधमपट्टी रंगराज, तर त्याची दुसरी पत्नी आहे प्रसिद्ध डिझायनर जॉय क्रिसिल्डा. जॉयने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मधमपट्टीसोबत लग्नाच्या वेशातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जॉयने लाल रंगाची साडी नेसली आहे, तर मधमपट्टीने धोतर-कुर्ता परिधान केला आहे. पण या सगळ्यामध्ये, जॉयच्या स्पष्टपणे दिसणाऱ्या बेबी बंपने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे, ज्यामुळे या लग्नाभोवतीचं गूढ आणखी वाढलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या रहस्यमय लग्नाबद्दल आणि प्रेग्नंसीबद्दल समजल्यापासून चाहते मधमपट्टीला धारेवर धरत आहेत. 'पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरं लग्न केलं का?', 'लग्नाआधीच गरोदर होती का?', 'शुभ मुहूर्तानुसार हे आषाढ महिन्यातलं लग्न असूच शकत नाही, मग जुना फोटो का व्हायरल केला?', असे अनेक प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
advertisement
आता या सगळ्यावर आणखी एक चर्चा सुरू झाली आहे की, जॉय क्रिसिल्डाने हे फोटो मुद्दाम व्हायरल केले का? आषाढ महिना सुरू असल्याने, या काळात लग्न होत नाहीत. त्यामुळे जॉयने शेअर केलेला लग्नाचा फोटो जुना असू शकतो आणि मधमपट्टीला हे फोटो व्हायरल झाल्याने खूप त्रास झाल्याचीही कुजबूज सुरू आहे. काही नेटकरी तर जॉय क्रिसिल्डाने मधमपट्टी रंगराजला ब्लॅकमेल करण्यासाठी असे फोटो पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे का, असाही प्रश्न विचारत आहेत.
advertisement