'त्यांनी मला सोडून स्वतःला निवडलं', आईवडिलांच्या घटस्फोटाचा गिरिजा ओकवर वाईट परिणाम, 17व्या वर्षी घडलं असं काही...

Last Updated:
Girija Oak Parents Divorce: अभिनेत्री गिरिजा ओक दिग्गज मराठी अभिनेते गिरिश ओक यांची मुलगी आहे. पण ती लहान असतानाच तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. अशा परिस्थितीत १७व्या वर्षीच तिला थेरिपीचा आधार घ्यावा लागला होता.
1/7
गेल्या काही दिवसांपासून नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झालेली मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओकने मराठीसह अनेक भाषांमध्ये लक्षवेधी काम केलं आहे. तिचा आकाशी साडीमधील फोटो व्हायरल झाला आणि रातोरात ती सोशल मिडिया सेन्सेशन बनली.

advertisement
2/7
मात्र, गिरिजा वयाच्या १५ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. ती दिग्गज मराठी अभिनेते गिरिश ओक यांची मुलगी आहे. पण ती लहान असतानाच तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. अशा परिस्थितीत १७व्या वर्षीच तिला थेरिपीचा आधार घ्यावा लागला होता. नुकतंच एका मुलाखतीत गिरिजाने तिच्या आयुष्यातील कठीण काळाबाबत भाष्य केले आहे.

3/7
आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या परिस्थितीतून बाहेर पडणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. यातून बाहेर पडण्यासाठी तिला मानसिक आधार घेण्याची गरज भासली. गिरिजा म्हणाली,
आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या परिस्थितीतून बाहेर पडणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. यातून बाहेर पडण्यासाठी तिला मानसिक आधार घेण्याची गरज भासली. गिरिजा म्हणाली, "मी खूप लहान असतानाच आई-वडिलांचा घटस्फोट झालेला. त्यामुळे अशा परिस्थितीत मी वाढले. मला बरं वाटावं आणि त्या वातावरणातून बाहेर यावं यासाठी मी थेरपी घेतली."
advertisement
4/7
आधी तिला फक्त शारीरिकदृष्ट्या काहीतरी बिघडल्यासारखे वाटले. ती फॅमिली डॉक्टरकडे गेली. पण डॉक्टरांनी तिला मानसोपचार तज्ज्ञांना भेटण्याचा सल्ला दिला. वयाच्या सतरा वर्षांची असताना तिने पहिल्यांदा थेरपिस्टला भेटून थेरपी घेतली, असे तिने सांगितले.

5/7
थेरपीच्या वेळी जर आई-वडिलांनी साथ दिली असती, तर गोष्टी अधिक चांगल्या झाल्या असत्या, असे मत गिरिजाने व्यक्त केले. ती म्हणाली,
थेरपीच्या वेळी जर आई-वडिलांनी साथ दिली असती, तर गोष्टी अधिक चांगल्या झाल्या असत्या, असे मत गिरिजाने व्यक्त केले. ती म्हणाली, "थेरपी तर घेतलीच; पण त्यावेळी जर आई-बाबा माझ्याबरोबर आले असते, तर माझ्याबरोबर त्यांनाही या गोष्टीचा नक्कीच फायदा झाला असता. जेव्हा कुटुंबात दुरावा येतो, तेव्हा वैयक्तिकरित्या खूप गैरसमज होतात आणि त्यावर उपायही नसतो."
advertisement
6/7
 गिरिजाने सांगितले की, आई-वडील वेगळे झाले, तेव्हा त्यांनाही खूप त्रास झाला. पण तो त्यांचा निर्णय होता, जो त्यांच्या दृष्टीने त्यांच्यासाठी बरोबर होता.

7/7
 "माझ्या आई-वडिलांनी स्वतःला निवडले. मला त्यावेळी खूप प्रश्न पडायचे. मला असं वाटायचं की, मला त्यांच्याबरोबर एकत्र राहायला मिळावं, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र राहावं," अशी लहानपणीची इच्छाही गिरिजाने यावेळी व्यक्त केली.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement