पूजा बिरारीने केलं कन्फर्म! सांगितलं कोणाची होणार सून, पहिल्यांदाच घेतलं होणाऱ्या अहोंचं नाव, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pooja Birari Marriage : अभिनेत्री पूजा बिरारीचं मालिकेत लग्न सुरू आहे. खऱ्या आयुष्यातही ती लग्न करतेय. पूजा नक्की कोणाची सून होणार हे अखेर तिने सांगून टाकलं आहे. पूजाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
येड लागलं प्रेमाचं या मालिकेत मंजिरी आणि रायाचं लग्न होतंय. खऱ्या आयुष्यात मंजिरी म्हणजेच अभिनेत्री पूजा बिरारी देखील लग्न करतेय. पूजा बिरारीच्या रिलेशनच्या चर्चा मधल्या काळात रंगल्या होत्या. पण तिने त्यावर स्पष्ट वक्तव्य केलं नव्हतं. अखेर पूजाने तिच्या लग्नाची बातमी कन्फर्म केली आहे. पूजा कोणाची सून होणार आहे हे तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं.
येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील कलाकारांनी पूजाचं केळवण करण्यात आलं. केळवणासाठी मालिकेतील सगळी मंडळी एकत्र आली होती. यावेळी पूजाने सगळ्यांच्या आग्रहाखातर उखाणा घेतला. या उखाण्यातून तिचं सोहम आणि बांदेकर कुटुंबावर असलेलं प्रेम पाहायला मिळालं.
advertisement
उखाणा घेत पूजा म्हणाली, "घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर, माझे आहो, म्हणजेच सोहम होणार माझे मिस्टर." पूजाच्या उखाण्यानंतर सगळ्यांना टाळ्या वाजवत तिचं कौतुक केलं.
अभिनेत्री पूजा बिरारी अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची सून होणार आहे. बांदेकरांचा मुलगामुलगा सोहम बांदेकरबरोबर ती लग्न करतेय. पूजा बिरारीबरोबर सोहम रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या होत्या. अखेर त्या चर्चा खऱ्या ठरल्या असून पूजा आणि सोहम लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पूजा बिरारी पहिल्यांदाच सोहमविषयी आणि बांदेकर कुटुंबाविषयी बोलली आहे.
advertisement
काही दिवसांआधी सोहम बांदेकरचं केळवण पार पडलं होतं. त्यानंतर आता पूजाचंही केळवण पार पडलं आहे. येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर पूजाचं मोठ्या थाटात केळवण करण्यात आलं. यावेळी पूजा तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल आणि बांदेकर कुटुंबाबद्दल पहिल्यांदाच बोलली आहे. पूजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
मागील अनेक महिन्यांपासून पूजा आणि सोहम रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. दोघांनी कधीच त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. पण त्यांच्या वागण्यातून दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचं पाहायला मिळालं. अनेकदा पूजाच्या फोटोंवर सोहमचे हार्ट इमोजी पाहायला मिळाले होते. इतकंच नाही तर सोहमची आई म्हणजेच अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनीही मुलाच्या लग्नासाठी उत्सुकता दाखवली होती. अखेर पूजाने सोहमच नाव घेत त्यांच्या लग्नाची बातमी कन्फर्म केली आहे.
advertisement
काही दिवसांआधी पूजाने सोहम आणि तिच्या नात्याबद्दल सगळ्यांना समजलं तेव्हा काय झाले होतं हे सांगितलं. ती म्हणाली होती, दोन सीनच्यामध्ये मला वेळ होता. मी झोपले होते. उठल्यानंतर माझ्या फोटोवर अनेक फोन आणि मेसेज आले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 3:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
पूजा बिरारीने केलं कन्फर्म! सांगितलं कोणाची होणार सून, पहिल्यांदाच घेतलं होणाऱ्या अहोंचं नाव, VIDEO


