Dhurandhar: धुरंधरचा ‘बडे साहब’ कोण? समोर आले मोठे नाव; पार्ट 2 मध्ये दिसणार हम्झाच्या हिटलिस्टमधील पुढील टार्गेट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Who Is Bade Sahab In Dhurandhar: ‘धुरंधर’च्या शेवटच्या दृश्यात हम्झा अली मझारीच्या हिटलिस्टमधील ‘बडे साहब’ हे नाव प्रेक्षकांसाठी मोठे गूढ ठरले आहे. या एका संकेतामुळेच आता ‘धुरंधर 2’मध्ये दाऊद इब्राहिमची एंट्री होणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
‘धुरंधर’ चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात रणवीर सिंग साकारलेला हम्झा अली मझारी आपल्या हिटलिस्टमधून रहमान डकैत (अक्षय खन्ना) याचं नाव खोडून टाकतो. त्या गुप्त डायरीच्या पानावर अनेक नावे दिसतात, जी त्याची पुढील टार्गेट असू शकतात. मात्र त्यातील एक नाव प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतो, ते म्हणजे ‘बडे साहब’.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सध्या हम्झाच्या डायरीतला तो एकमेव महत्त्वाचा धागा म्हणजे बडे साहब. तो नक्कीच या भारतीय गुप्तहेराचे एक मोठे लक्ष्य आहे. 90च्या दशकात गुन्हेगारी, राजकारण आणि दहशतवाद यांच्याशी दाऊद इब्राहिमचे जाळे खोलवर पसरलेले होते. त्यामुळे तो चित्रपटात आला, तर ‘धुरंधर 2’मध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार, यात शंका नाही.








