Palghar : दुचाकी धडकल्याने रिक्षा उलटली, 14 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Last Updated:
राहुल पाटील, पालघर : डहाणू जव्हार मार्गावर कासा जवळील वरोती येथे आज अकरा वाजताच्या सुमारास रिक्षा आणि बाईकचा भीषण अपघात झाला.
1/5
पालघर - डहाणू जव्हार मार्गावर कासा जवळील वरोती येथे आज अकरा वाजताच्या सुमारास रिक्षा आणि बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे.

advertisement
2/5
डहाणूतील वांगर्जे येथून संगीता सुभाष डोकफोडे ही विद्यार्थीनी सूर्यानगर येथे रिक्षाने शाळेत जात होती. वरोती जवळ चालकाचं रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्याकडेला घसरली.

3/5
रिक्षा रस्त्याकडेला घसरली तेव्हाच भरधाव बाईकने या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर रिक्षा पलटी झाल्याने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर रिक्षातील प्रवाशांसह बाईकस्वार असे एकूण सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

4/5
अपघातात मयत संगीताची मैत्रीण अंकिता हाडल ही सातवीत शिकणारी विद्यार्थिनी देखील जखमी झालीय. याशिवाय लता बेडगा, प्रमोद लोहार , रमेश कोदे , रिक्षा चालक भास्कर डोकफोडे आणि बाईकस्वार कैलास धानमेहेर हे जखमी आहेत

5/5
अपघातातील जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान डहाणू जव्हार मार्गावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य वाढलेल असून यामुळेच हा अपघात झाल्याच प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आलं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement