ताप, सर्दी, खोकल्याने त्रस्त आहात? करा 'हे' आयुर्वेदिक उपाय, होणार नाही व्हायरल इन्फेक्शन!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
राज्यात मान्सून दाखल झाल्याने वातावरणात उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे, ज्यामुळे कोरोना आणि इतर व्हायरल आजारांचा प्रसार वेगाने...
सध्या राज्यात मॉन्सून दाखल झाल्यामुळे अनेक भागांमध्ये हवामानात बदल दिसून येतो आहे. काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे, तर काही ठिकाणी, अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. या काळात वातावरणात उष्णता आणि आर्द्रता वाढलेला आहे. त्यामुळे सध्या कोरोना आणि इतर व्हायरल आजारांचा प्रसार लवकर होतो आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांपासून बचावासाठी काय काळजी घ्यावी, हे आपण एका आयुर्वेदतज्ज्ञाकडून समजून घेणार आहोत.
advertisement
जामनगर येथील केंद्रीय आयुर्वेद संस्थेतील (ITRA) पदार्थ गुणधर्म विभागाचे प्रमुख वैद्य भूपेश पटेल यांनी सांगितले की, "पावसाळ्याच्या आगमनानंतर वातावरणात उष्णता आणि ओलावा वाढतो. त्यामुळे संसर्गजन्य आणि व्हायरल आजार वाढतात. सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शरीर आजारमुक्त राहावं यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे."
advertisement
advertisement
advertisement