Health Tips: पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' 5 भाज्या; नाहीतर पडाल आजारी, कारण...
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
पावसाळ्यात थोडाही निष्काळजीपणा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. यामुळे अपचन, फूड पॉइजनिंग, व पोटदुखी होण्याचा धोका असतो. अशा भाज्या खाण्यापूर्वी योग्य साफसफाई आणि सावधगिरी आवश्यक आहे...
पावसाळा जितका आरामदायी वाटतो, तितकाच तो आरोग्यासाठी धोकादायकही असतो. विशेषतः खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडा जरी निष्काळपणा झाला, तरी पोटाचे विकार उद्भवू शकतात. या हंगामात काही भाज्या अशा असतात, ज्यांना लवकर कीड लागते. अशा परिस्थितीत, या काळात कोणत्या भाज्या खाऊ नयेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मुळ्याची पाने : पावसाळ्यात मावा, स्पायडर माइट्स आणि इतर सूक्ष्म कीटक मुळ्याच्या पानांवर वेगाने हल्ला करतात. हे कीटक पाने खाऊन त्यांना खराब करतातच, पण त्यांच्यातून स्रवणारे चिकट पदार्थ संसर्ग पसरवू शकतात. जर तुम्ही मुळ्याची पाने भाजी म्हणून खात असाल आणि हे कीटक शरीरात पोहोचले, तर त्यामुळे पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात.