Union Budget 2026 : दारू स्वस्त होणार की महाग? India-EU ट्रेड डीलनंतर बजेटमध्ये निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Union Budget 2026 Alcohol Nirmala Sitharaman : हाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली. तर काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. तर काही वस्तू महाग असणार आहेत. तर इनकॅम टॅक्समध्ये कोणताही बदल केला गेला नाही.
Union Budget 2026 : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 2026-27 आज संसदेत सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग नवव्यांदा लोकसभेत 2026-27 मांडण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली. तर काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. तर काही वस्तू महाग असणार आहेत. तर इनकॅम टॅक्समध्ये कोणताही बदल केला गेला नाही.
दारू स्वस्त की महाग?
कॅन्सरची औषध, मोबाईल, टीव्ही, फ्रीज, मधुमेहाची औषघं स्वस्त होणार आहे. तसेच भारतात तयार होणारी कपडे देखील स्वस्त होतील. तर खनिज आणि भंगार महाग होणार आहे. ऑप्शनल ट्रेडिंगवरचा कर देखील वाढवला आहे. परदेशात शिक्षण घेणं देखील आता स्वस्त होणार आहे. तसेच सोलर संबंधी वस्तू देखील स्वस्त होतील. तसेच सीएनजी आणि बायोगॅस देखील स्वस्त होईल. तर दारू महाग होणार असल्याचं निर्मला सितारमण यांनी म्हटलं आहे.
advertisement
दुर्धर आजारांसाठी कमी दरात औषधं उपलब्ध
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सितारमण यांनी देशातील मधूमेह, कॅन्सर सारख्या आजारांची भीषणता लक्षात घेत, महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी दुर्धर आजारांसाठी कमी दरात औषधं उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशात मधूमेह, कॅन्सर आजारावरची औषधं स्वस्त करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
advertisement
चंदन, नारळ आणि काजू
अर्थमंत्र्यांनी सांगितले, "आम्हाला दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन बळकट करायचे आहे. आम्ही नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतो. चंदन, नारळ आणि काजू चांगले उत्पन्न देतात. आम्हाला ईशान्य भागात बदाम आणि शेंगदाण्याला प्रोत्साहन द्यायचे आहेत."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 12:42 PM IST
मराठी बातम्या/देश/
Union Budget 2026 : दारू स्वस्त होणार की महाग? India-EU ट्रेड डीलनंतर बजेटमध्ये निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा!










