advertisement

India EU Trade Deal : तळीरामांसाठी गुड न्यूज! वाईनसह बिअरही होणार स्वस्त, ट्रेड डीलमध्ये काय काय ठरलं?

Last Updated:

India EU Trade Deal : बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सारख्या गाड्यांवर सध्या आकारला जाणारा 110 टक्के टॅक्स आता थेट 10 टक्क्यापर्यंत खाली येईल. तर सर्वात मोठी घोषणा म्हणजे प्रिमियर दारू देखील स्वस्त होणार आहे.

India EU Trade Deal Beer along with wine will become cheaper
India EU Trade Deal Beer along with wine will become cheaper
India EU Trade Deal : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेने भरसाठ कर लादल्यानंतर आता जागतिक बाजारपेठेत नवे डावपेच सुरू झाले आहेत. याचाच एक भाग असलेल्या भारत आणि युरोपीय युनियन यांच्यात ऐतिहासिक 'फ्री ट्रेड डील'ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या करारावर दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केलं असून नवे दरवाजे भारतीयांसाठी उघड झाले आहेत. या करारामध्ये तळीरामांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. बिअरसह आता वाईन देखील स्वस्त होणार आहे.

प्रिमियर दारू देखील स्वस्त होणार

पंतप्रधान मोदींनी या कराराचे वर्णन 'मदर ऑफ ऑल डील' असं केलं असून, जागतिक स्तरावर या मोठ्या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या करारामुळे भारतात आता युरोपीय लक्झरी कार खरेदी करणं स्वस्त होणार आहे. बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सारख्या गाड्यांवर सध्या आकारला जाणारा 110 टक्के टॅक्स आता थेट 10 टक्क्यापर्यंत खाली येणार आहे. तर सर्वात मोठी घोषणा म्हणजे प्रिमियर दारू देखील स्वस्त होणार आहे.
advertisement

वाईन आणि बिअर देखील स्वस्त

युरोपमधून येणारी वाईन आणि बिअर देखील स्वस्त होणार आहेत. वाईनवर सध्या असलेला 150 टक्के टॅक्स आता 20 ते 30 टक्क्यांपर्यंत खाली येईल, तर बिअरवरील टॅक्स 110 टक्के वरून 50 टक्के करण्यात आला आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या बाबतीतही मोठा दिलासा देण्यात आला असून, ऑलिव्ह ऑईल आणि इतर वनस्पती तेलांवरील टॅक्स आता शून्य करण्यात आला आहे.
advertisement

तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा फायदा

भारत सरकारने दरवर्षी 2.5 लाख गाड्यांचा कोटा निश्चित केला असून, टप्प्याटप्प्याने हे शुल्क कमी केले जाईल. यामुळे वाहन क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही या डीलचा मोठा फायदा भारताला होणार आहे. मेडिकल आणि सर्जिकल उपकरणांपैकी जवळपास 90 टक्के साहित्य आता टॅक्स-फ्री होणार आहे. याशिवाय रसायने, विमाने आणि अंतराळ क्षेत्राशी संबंधित उपकरणांवरील टॅक्स पूर्णपणे रद्द किंवा अत्यंत कमी करण्यात आला आहे.
advertisement

औद्योगिक विकासाला मोठी गती

दरम्यान, मशिनरीवर लागणारा 44 टक्के टॅक्स आणि रसायनांवरील 22 टक्के टॅक्स आता जवळपास संपुष्टात येणार आहे. युरोपीय तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेत स्वस्त दरात उपलब्ध झाल्यामुळे औद्योगिक विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे. भारत आणि युरोपमधील हे आर्थिक संबंध भविष्यात जागतिक व्यापाराची समीकरणे बदलवणारे ठरणार आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
India EU Trade Deal : तळीरामांसाठी गुड न्यूज! वाईनसह बिअरही होणार स्वस्त, ट्रेड डीलमध्ये काय काय ठरलं?
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement