फक्त 20 रुपयात मिळते प्लेट; 86 वर्षांपासून प्रसिद्ध बुढीचा चिवडा कधी खाल्लाय का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
86 वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात बुढीचा चिवडा म्हणून हा चिवडा अतिशय प्रसिद्ध आहे.
advertisement
या चिवड्याला 10 किंवा 20 वर्ष नाही तर तब्बल इंग्रज काळापासून 86 वर्ष झालेत. स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात सुरू झालेला हा चिवड्याचा व्यवसाय आता चौथी पिढी सांभाळत आहे. स्वर्गीय अंजनाबाई भुजाडे यांनी सुरू केलेला हा व्यवसाय त्यांचे पणतू अजय भुजाडे सध्या चालवत असून यवतमाळ जिल्ह्यात बुढीचा चिवडा म्हणून हा चिवडा अतिशय प्रसिद्ध आहे.
advertisement
अंजनाबाई यांचे पती एका कपड्याच्या दुकानात कामाला होते. 1936 साली अंजनाबाई भुजाडे यांनी संसार चालवताना पतीला हातभार मिळावा म्हणून याच जागी चिवड्याचा व्यवसाय सुरू केला. आता त्यांचे पणतू अजय भुजाडे हे व्यवसाय सांभाळत आहेत. मात्र तेव्हापासून त्याच जागी तीच चिवड्याची चव यवतमाळकर आवर्जून चाखून जाताहेत.
advertisement
advertisement
advertisement
भाजलेले पोहे, मटकी, कांदा, विशेष मसाले आणि लिंबू यांचे मिश्रण घालून स्वादिष्ट चमचमीत चिवडा तयार केला जातो. या चिवड्याची चव यवतमाळकर विदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडेही पाठवत असतात. त्यामुळे उच्चशिक्षित असूनही नोकरीचा मार्ग सोडून आजीचा व्यवसाय पुढे नेण्याचा भुजाडे यांचा प्रयत्न प्रेरणादायी ठरतोय.


