चांदीच्या ताटात सोन्याचा घास! जेवणासाठी लागतात रांगा, पुण्यातील ठिकाण माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील वंदना पंडित आणि त्यांचे पती सीताराम पंडित हे दाम्पत्य गेली 27 वर्ष झालं केटरिंगचा व्यवसाय करत आहेत. मागील 8 वर्षांपासून त्यांनी मोरे गोसावी मंदिराजवळ स्वामी स्नेह डायनिंग हॉल सुरू करून चांदीच्या ताटात अस्सल सात्विक जेवणाची थाळी देत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चांदीच्या ताटामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रीयन जेवण हे दिलं जातं. त्यामध्ये 13 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ पाहिला मिळतात. तर गोडाशिवाय हे ताट 260 रुपये आणि गोड पदार्थ घेतला तर त्याचे दर हे तसे त्यामध्ये ऍड होतात. पुरणपोळी, मुग हलवा, रबडी, गुलाबजाम, श्रीखंड जे महाराष्ट्रात तयार होणारे पदार्थ आहेत तेच देण्याचा प्रयत्न हा आम्ही करतो. सुरुवात केली तेव्हा 50 ताट घेऊन ती केली होती. हळू हळू 20 ते 30 ताट घेत अशी आता जवळपास 130 ताट ही आहेत. पुढील काही दिवसात 400 ताट करण्याचा आमचा निर्धार आहे, अशी माहिती वंदना पंडित यांनी दिली आहे.