पोटातल्या कानाकोपऱ्यातली घाण स्वच्छ करते 'ही' भाजी, फायदे वाचाल तर आजपासूनच जेवणात समाविष्ट कराल!

Last Updated:
Bitter gourd Karela benefits : कारलं म्हटलं की, अनेकजण नाक-तोंड मुरडतात. परंतु खरंतर कारलं जेवढं चवीला कडू असतं तेवढंच आरोग्यासाठी गोड ठरतं. कारल्यात अनेक आरोग्यपयोगी गुणधर्म असतात. ज्यामुळे मोठमोठ्या आजारांपासून शरीराचं रक्षण होऊ शकतं. कारल्यात आयर्न, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, मॅगनीज, पोटॅशियम, झिंक, अँटिऑक्सिडंट आणि हायपोग्लायसेमिक, इत्यादी अनेक पोषक तत्त्व असतं. कारल्यातून शरिराला नेमके काय फायदे मिळतात, जाणून घेऊया. (सिमरनजीत, प्रतिनिधी / शाहजहापूर)
1/5
कारल्यात अँटिव्हायरल गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नियमितपणे कारलं खाल्ल्यास श्वासासंबंधी आजार, हृदयरोग, किडनी, यकृत, पचनसंस्था, डोळे, रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. तसंच कारल्यामुळे शरीराचा थकवा दूर होतो. कारल्यामुळे शरीरातील इंसुलिनचा स्तरही संतुलित राहू शकतो. 

advertisement
2/5
कारलं वजन कमी करण्यास अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतं. त्यामुळे सतत भूक लागत नाही. तसंच मेटाबॉलिज्म बूस्ट झाल्यानं पोट सुदृढ राहतं आणि अन्नपचन व्यवस्थित होतं. ज्यामुळे वजनही कमी होऊ शकतं. 

3/5
कारल्यात पोटॅशियम भरपूर असतं. ज्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि हृदयाचं आरोग्य सुदृढ राहतं. एवढंच नाही तर कारल्यात असलेल्या पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतं दररोज कारलं खाल्ल्यास धमन्या स्वच्छ राहतात आणि रक्ताभिसरण सुरळीत होतं.

4/5
डॉक्टर सांगतात की, कारल्यात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येऊ शकतं. कारल्यामुळे त्वचा तजेलदार दिसतेच, शिवाय केसांची वाढही उत्तम होते. केसातील कोंडा कमी होतो. 

5/5
डॉ. विद्या गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, कारल्यामुळे पचनसंस्थेचं कार्य सुधारतं. अपचन, बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटीवर आराम मिळतो. यात भरपूर फायबर असतं, त्यामुळे आतडे स्वच्छ राहतात आणि अन्नपदार्थ लवकर पचतात. कारलं यकृत डिटॉक्स करण्यासही फायदेशीर ठरतं. ज्यामुळे पचनसंस्थेचं कार्य उत्तम राहतं. 

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement