Hair Care Tips : काहीही केल्या थांबत नाहीये केस गळती? हा देशी नैसर्गिक उपाय वापरून तर पाहा...
- Published by:
- local18
Last Updated:
Hairfall Home Remedies : पावसाळ्यात केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. ती थांबवण्यासाठी अनेक जण विविध प्रकारचे केमिकल किंवा तेल वापरतात. परंतु एक सोप्पा घरगुती उपाय केल्यास तुमची ही समस्या दूर होऊ शकते. केसगळतीवर भेंडी हा एक प्रभावी उपाय आहे. भेंडीत असलेले नैसर्गिक स्लाईम आणि पोषक घटक टाळूला मॉइश्चरायझ करतात आणि केसांना मजबूत बनवतात. भेंडीपासून बनवलेले हेअर मास्क आणि तेलाचे 5 सोपे उपाय वापरून केस गळणे रोखता येते.
केसांसाठी भेंडीचे फायदे : पावसाळ्यात हवेत ओलावा वाढल्यामुळे केसांच्या अनेक समस्या वाढतात. यात केस गळणे, कोरडी टाळू आणि कोंडा अशा समस्यांचा समावेश असतो. अशा वेळी तुम्ही केसांच्या देखभालीसाठी भेंडीचा वापर करू शकता. भेंडी हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. जाणून घेऊया भेंडी केसांसाठी कशी फायदेशीर ठरते?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement