Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यात त्वचेचे आजार होण्याची शक्यता, चेहऱ्याची अशी घ्या काळजी, तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:
पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेताना कोणत्या चुका टाळाव्यात? याबाबत माहिती सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
1/7
पावसाळ्यात जर सतत पाऊस सुरू असेल तर कपडे ओलसर राहतात. त्यामुळे वेगवेगळे त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. काही वेळा ओलसर टॉवेल किंवा वेगळ्या कोणत्या कापडाने आपण चेहरा पुसतो.

advertisement
2/7
पण, तो कापड ओलसर असल्याने चेहऱ्यावर पुरळ येणे, चेहरा लालसर होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेताना कोणत्या चुका टाळाव्यात? याबाबत माहिती सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.

3/7
याबाबत माहिती देताना सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, पावसाळा म्हटलं की, कपडे वाळत नाहीत आणि त्यामुळे मग त्वचेचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. आपण पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेताना अशा काही चुका करतो, ज्याकडे आपले लक्ष राहत नाही.

4/7
या छोट्या छोट्या चुका आपल्याला महाग पडू शकतात. त्या कोणत्या? तर सर्वात पहिले म्हणजे आपण अनेकवेळा ओल्या कापडाने चेहरा पुसतो. त्यामुळे चेहरा लालसर होऊन त्यावर पुरळ येतात. त्यावर लक्ष दिले नाही तर ते वाढत जाते, असे त्यांनी सांगितले.

5/7
पुढे त्या सांगतात की, पावसाळ्यात ठेवलेल्या अनेक वस्तूंवर बुरशी लागते. त्यातीलच एक म्हणजे मेकअप ब्रश. आपण एखाद्या वेळी मेकअप करतो आणि ब्रश तसेच ठेवून देतो. ठेवलेले असल्याने त्या ब्रशला बुरशी लागते.

6/7
 आपले लक्ष नसल्यास आपण ते ब्रश तसेच पुन्हा मेकअप करण्यासाठी वापरतो. त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येणे किंवा फंगल इन्फेक्शन होणे या सारख्या समस्या होऊ शकतात. त्याचबरोबर चेहऱ्याला खाज सुटणे हे देखील त्यात समाविष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

7/7
सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात वापरण्यात येणारे सर्व कापड, ब्रश आणि इतर काही गोष्टी स्वच्छ धुवून आणि वाळवूनच वापराव्यात. त्यामुळे त्वचेचे आजार होणार नाहीत. चेहरा क्लीन राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर त्वचा रोगांची काही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement