Healthy Summer Fruits: उन्हाळ्यात ही 5 फळे खाल, तर दवाखान्याच्या खर्चापासून लांब राहाल!

Last Updated:
Summer Health: उन्हाळ्यात शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनच्य समस्येला सामोरं जावं लागू शकतं. कलिंगड आणि इतर 5 फळे या काळात अत्यंत लाभदायी मानली जातात.
1/7
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे डिहायड्रेशन किंवा इतर आजारांचा त्रास होऊ शकतो. या काळात बहुतांश लोकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवते. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आहार शरीराला लगेच ऊर्जा देतील, अशी 5 फळे आवर्जून खावीत असं कोल्हापुरातील आहारतज्ज्ञ क्रांतिसिंह शिंदे सांगतात.

advertisement
2/7
कलिंगडात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे उन्हाळ्यात हे फळ खाणं फायद्याचं ठरतं. या फळाचे सेवन केल्याने शरीराला पाण्याचा पुरवठा होतो आणि ऊर्जा देखील मिळते. याशिवाय यात भरपूर फायबर, पोटॅशिअम, लोह आणि इतर अनेक घटक असतात.

3/7
संत्र्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आढळते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. वजन कमी करायचे असेल तर संत्री खूप फायदेशीर ठरते. याशिवाय संत्र्यात अमिनो अॅसिड, फायबर, कॅल्शियम, आयोडीन, फॉस्फरस, सोडियम, खनिजे, जीवनसत्त्वे अ आणि ब यांसारखे उत्तम घटक आढळतात.

4/7
खरबूज हे फळ चवीला सौम्य गोड लागते. या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चे विपुल प्रमाण आढळून येते. या दोन्ही घटकांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये आढळून येणारे बीटा कॅरोटीन हे आपले डोळे निरोगी ठेवण्याचे काम करते.

5/7
लिची आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून त्यात शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक असतात. लिचीमध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न हे घटक मुबलक प्रमाणात असतात. तसेच लिचीमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असल्याने तात्काळ एनर्जी मिळण्यास मदत होते, लिचीमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असते त्यामुळे पोटात थंडावा निर्माण होतो.

6/7
सफरचंद हे प्रत्येक ऋतूत आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात सफरचंद खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि हायड्रेशन चांगले होते. सफरचंदमध्ये प्रति 100 ग्रॅम सुमारे 85 ग्रॅम पाणी असते, ज्यामुळे ते उन्हाळ्यासाठी देखील एक सुपरफूड बनते. सफरचंद कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

7/7
उन्हाळ्यात ताजी व रसदार फळे खाणं आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानलं जातं. तसेच हंगामात उपलब्ध असणारी आंबा, नारळ आणि इतर फळे व भाजीपाला यांचा देखील आहारात समावेश करावा, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement