Mental Health : मेंटल हेल्थ करायचीय मजबूत तर, रोज खेळा 'हे' इनडोर गेम्स; डॉक्टरही करतात रेकमेंड
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अलिकडच्या काळात मानसिक आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कामाचा ताण, सोशल मीडियाचा वापर आणि बाहेरील जगापासून दूर राहिल्यामुळे अनेकजण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले आहेत. अशा परिस्थितीत, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी बैठे खेळ एक प्रभावी मार्ग म्हणून समोर आले आहेत.
अलिकडच्या काळात मानसिक आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कामाचा ताण, सोशल मीडियाचा वापर आणि बाहेरील जगापासून दूर राहिल्यामुळे अनेकजण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले आहेत. अशा परिस्थितीत, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी बैठे खेळ एक प्रभावी मार्ग म्हणून समोर आले आहेत. अनेक अभ्यासांनुसार, बुद्धीबळ, कॅरम, पत्ते आणि कोडी यांसारख्या खेळांमुळे तणाव कमी होतो आणि मानसिक शक्ती वाढते.
advertisement
डॉ. कल्पना रावल म्हणतात की, इनडोअर गेम्स हे केवळ मनोरंजन नाही तर मानसिक तंदुरुस्तीसाठी एक प्रकारचा व्यायाम देखील आहे. सततचा ताण, चिंता आणि नैराश्य आपली विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमकुवत करू शकते. अशा परिस्थितीत, जर आपण दररोज काही मानसिक खेळ खेळलो तर आपला मूड चांगला राहतोच, शिवाय आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता देखील सुधारते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मानसिक आरोग्य बळकट करणे हे फक्त ध्यान आणि औषंधापुरती मर्यादित नाही. जर तुम्ही दररोज थोडा वेळ इनडोर गेम खेळलात तर त्याने तुमचे मन सक्रिय, आनंदी आणि तणावमुक्त राहील. तुमच्या मेंदू आणि मनाला स्ट्रेसफ्री ठेवण्यासाठी हा एक सोपा मार्ग असू शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)


