Jyeshthamadh Benefits : ज्येष्ठमध खाल्ल्याने होतात 'हे' जबरदस्त फायदे! कोणी आणि कसे खावे?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
जेष्ठमध आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. आयुर्वेदात याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. ज्येष्ठमध खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक रोगांवर मात करण्यासाठी जेष्ठमध गुणकारी आहे. यात प्रोटीन्स, अँटीपायोटिक्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. तसेच यात कॅल्शियम देखील असते. त्यामुळे अनेकदा सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्यास घरातील वडीलधारी माणसं जेष्ठमध खाण्याचा सल्ला देतात.
ज्येष्ठमध हे बहुगुणी औषध असून त्याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिका शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते. ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे. परंतु जेष्ठमधाचा मर्यादित प्रमाणातच वापर केल्यास फायदा होतो, त्याचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement