फॅशनसाठी बेस्ट कोरिअन बॅग, खरेदी करा मुंबईतील प्रसिद्ध मार्केमध्ये 300 रुपयात, PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
कोरियन बॅग इथे तुम्हाला 300 रुपयांपासून मिळून जातील. मुलींसाठी खास वन साईडेड वेगवेगळ्या प्रकारचे कोरियन झोला फक्त 500 रुपयांमध्ये मिळतात.
advertisement
लहान मुलांपासून अगदी मोठ्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टर्न स्टाईलचे कपडे, बॅग, शूज, बेल्ट, घड्याळ, चष्मा अशा सगळ्या वस्तू इथं अगदी 100 ते 200 रुपयांपासून मिळतात. याच फॅशन स्ट्रीटवर आकर्षक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग देखील अगदी होलसेल दरात मिळतात. याबाबतच आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
चर्चेगेट रेल्वे स्थानकावर उतरल्यावर अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर तुम्हाला फॅशन स्ट्रीट मार्केट दिसते. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकात आलात तरी देखील तुम्ही अगदी 10 मिनिटात फॅशन स्ट्रीट मार्केटला पोहोचू शकता. म्हणजे दोन्हीही रेल्वे स्थानकांपासून तुम्हाला हे मार्केट अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे.
advertisement
advertisement
advertisement
हिमालय प्रदेशात वापरल्या जाणार हेम्प बॅग या सध्या सर्वत्र प्रसिद्ध आहेत. या बॅग तुम्हाला इतर ठिकाणी 400 ते 500 रुपयांमध्ये मिळून जातील, मात्र या दुकानात त्या बॅग फक्त तुम्हाला फक्त 350 रुपयांमध्ये मिळून जातील. या बॅगमध्ये तुम्हाला 20 पेक्षा जास्त प्रकार आणि रंग विकत मिळून जातील. एवढेच नव्हे तर वन साईड बॅग तुम्हाला फक्त 200 रुपयांमध्ये या ठिकाणी मिळून जातील.
advertisement