Sensitive Skin Care : पावसाळ्यात संवेदनशील त्वचेची अशी घ्या काळजी, फॉलो करा हे खास स्किन केअर रुटीन
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How To Build A Skincare Routine For Sensitive Skin : पावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या सुरू होतात. या ऋतूमध्ये वाढलेली आर्द्रता आणि वातावरणातील बदलांमुळे त्वचा अधिक संवेदनशील होते, ज्यामुळे जळजळ, मुरुम आणि इतर समस्या येऊ शकतात. पण काही खास टिप्स वापरून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.
चेहऱ्यासाठी सौम्य क्लीन्झर वापरा : तुमच्या स्किनकेअर रुटीनची सुरुवात सौम्य क्लीन्झरने करा. यामुळे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल, घाण आणि प्रदूषण दूर होते. संवेदनशील त्वचेसाठी डिझाइन केलेले उत्पादन वापरा. असे क्लीन्झर निवडा. ज्यात नियासिनमाइड, पॅन्थेनॉल आणि हायड्रेटिंग ग्लिसरीन सारखे घटक असतील.
advertisement
advertisement
पावसाळ्यातही सनस्क्रीन वापरा : ढगाळ वातावरण असले तरी हानिकारक यूव्ही किरणे तुमच्या संवेदनशील त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. म्हणूनच, एसपीएफ 30 किंवा त्याहून अधिक असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. ऑक्सीबेंझोन आणि पॅराबेन्स सारख्या कठोर रसायनांशिवाय तयार केलेले सनस्क्रीन निवडा. बाहेर वेळ घालवत असाल, तर दर दोन ते तीन तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावा.
advertisement
टोनर वापरून अतिरिक्त तेल कमी करा : मान्सूनमध्ये आर्द्रतेमुळे त्वचा जास्त तेलकट होऊ शकते. हे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी, तुमच्या रुटीनमध्ये सौम्य टोनरचा समावेश करा. विच हेझेल किंवा टी ट्री ऑइल यांसारखे नैसर्गिक घटक असलेले टोनर निवडा. क्लीन्झर वापरल्यानंतर आणि मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी टोनर वापरा.
advertisement