Kidney Damage : त्वचेत होणारे 'हे' बदल असतात धोक्याचे संकेत! दुर्लक्ष टाळा, नाहीतर गमावून बसाल किडनी..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Early signs of kidney damage : मूत्रपिंड शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्त गाळून त्यातील यूरिया, क्रिएटिनिन, विषारी पदार्थ आणि ऍसिड यांसारखे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ वेगळे करून मूत्र तयार करतो. जगातील लाखो लोक मूत्रपिंडाच्या विविध आजारांनी त्रस्त आहेत. परंतु त्यापैकी बहुतेकांना याची जाणीव नसते. म्हणूनच मूत्रपिंडविकाराला 'सायलेंट किलर' म्हटले जाते. कारण हा आजार गंभीर होईपर्यंत त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत.
लोक अनेकदा त्यांचा रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल तपासतात, परंतु मूत्रपिंडाच्या कार्याची तपासणी करण्यासाठी रक्तातील बेसिक क्रिएटिनिन तपासणी करणे विसरतात. मूत्रपिंड विकाराची अनेक धोक्याची लक्षणे आहेत, पण ती सहसा दुर्लक्षित केली जातात किंवा इतर सामान्य विकारांची लक्षणे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. मूत्रपिंड निकामी झाल्यास त्याची काही प्रारंभिक चिन्हे सर्वात आधी त्वचेवर दिसू लागतात.
advertisement
त्वचेवरील कोरडेपणा आणि खाज : अमेरिकेच्या नॅशनल किडनी फाऊंडेशननुसार, मूत्रपिंडाचे कार्य केवळ शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढणे नाही, तर लाल रक्तपेशी बनवणे, हाडांची मजबूती आणि खनिजांचे संतुलन राखणे हे देखील आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यावर खनिजांचे संतुलन बिघडते, ज्यामुळे त्वचा खूप कोरडी आणि खाज सुटणारी होते. ही समस्या अनेकदा मिनरल आणि बोन डिसीजचे संकेत देते.
advertisement
त्वचेवर सूज : जेव्हा मूत्रपिंड टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव शरीराबाहेर काढू शकत नाहीत, तेव्हा शरीरात द्रवपदार्थ जमा होऊ लागतात. याचा परिणाम सर्वप्रथम चेहरा, डोळ्यांभोवतीचा भाग, पाय, घोटा आणि हात यांमध्ये सूज दिसते. हे मूत्रपिंड निकामी होण्याचे एक सामान्य आणि गंभीर संकेत आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
advertisement
त्वचेच्या रंगात बदल : मूत्रपिंड निकामी झाल्यास शरीरात टॉक्सिन्स जमा होऊ लागतात, ज्यामुळे त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा किंवा फिका दिसू लागतो. याशिवाय, मूत्रपिंडाच्या आजाराशी संबंधित एक सामान्य लक्षण म्हणजे ॲनिमिया, ज्यामुळे त्वचा पिवळी पडू शकते. बऱ्याच काळासाठी असे राहिल्यास हे गंभीर मूत्रपिंड संक्रमण आणि डॅमेजचे संकेत असू शकते.
advertisement
सतत खाज, चट्टे आणि जखमा : मूत्रपिंड निकामी झाल्यास संपूर्ण शरीरात तीव्र खाज सुटते. मूत्रपिंड खराब झाल्याने त्वचा खूप कोरडी होते आणि ही खाज दिवस-रात्र त्रास देते. काही नेफ्रोलॉजिस्ट्सच्या मते, शरीरात फॉस्फरसचे प्रमाण वाढल्यास ही खाज अधिक वाढू शकते. सतत खाजवल्याने त्वचेवर जखमा, खुणा, जाड त्वचा किंवा खाज येणाऱ्या गाठी देखील बनू शकतात.
advertisement
या लक्षणांपासून वाचण्यासाठी त्वचेला नियमितपणे मॉइश्चराइझ करणे आणि आहारातून फॉस्फरसची मात्रा नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास शरीरात थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे दिसू शकतात. अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि क्रिएटिनिन तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement


