'तुमची मुलं खराब निघाली तर आम्ही काय करू?' इन्फ्लूएन्सरने सर्वांसमोरच अमिताभ बच्चन यांना विचारला जाब, VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Amitabh Bachchan : एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरने अमिताभ बच्चन यांना सर्वांसमोरच जाब विचारला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या इन्फ्लूएन्सरचे कौतुक केले आहे.
मुंबई: बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. आजवर त्यांनी अनेक वेगवेगळ्या पठडीच्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या चित्रपटांचा प्रभाव इतका होता की लोक त्याचा संबंध त्यांच्या खाजगी आयुष्याशीही जोडत असत. अशातच एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरने अमिताभ बच्चन यांना सर्वांसमोरच जाब विचारला.
लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती १७' च्या सेटवर जेव्हा स्टँड-अप कॉमेडीचे दिग्गज दाखल झाले, तेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत खूप धमाल झाली. कॉमेडियन हर्ष गुजरालने चक्क बिग बींच्या २००३ मधील सुपरहिट चित्रपट 'बागबान' वर कॉमेडी केली आणि अनेक भारतीय मुलांच्या मनातील खदखद नॅशनल टीव्हीवर बोलून दाखवली. हर्षच्या या कॉमेडीमुळे अमिताभही थोडे शॉक झाले.
advertisement
हर्षने सर्वांसमोरच बिग बींना विचारला जाब
'बागबान' चित्रपट भारतीय पालकांसाठी त्यांच्या मुलांना ब्लॅकमेल करण्याचे एक सिनेमॅटिक शस्त्र बनले आहे, असे मत हर्ष गुजरालने खुलेपणाने मांडले. आपल्या स्टँड-अप सेगमेंटमध्ये हर्षने थेट अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिले आणि विचारले, "सर, तुम्ही तो चित्रपट का केला? भारतात मुलांना फक्त दोनच चित्रपटांची भीती वाटते, ते म्हणजे रात्री 'वीराना' आणि दिवसा 'बागबान'."
advertisement
हर्षने एका सामान्य मुलाचा अनुभव सांगताना म्हटले, "चित्रपट दाखवायला घेऊन जातानाही आमचे आई-वडील आम्हाला मारायचे. आम्हाला वाटायचे की, त्यांनी अजून चित्रपट पाहिला नाहीये, तरी एवढा मारत आहेत, पाहिल्यावर तर जीवच घेतील!" यावेळी चित्रपटाचा परिणाम कुटुंबांवर कसा झाला, हे हर्षने दाखवून दिले.
बाप शेर, तर लेक सव्वा शेअर! पंकज त्रिपाठी यांचं चाहत्यांना सरप्राइज, मुलीने शेअर केली मोठी Good News
advertisement
हर्ष म्हणाला, "चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या कुटुंबात 'बागबान'चे युग सुरू झाले. माझ्या वडिलांनी माझ्यावर त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवल्याचा आरोप करायला सुरुवात केली, तेव्हा मला त्यांना आठवण करून द्यावी लागली की, 'आपण तर भाड्याच्या घरात राहतो!'" हर्षने मजेत अमिताभ बच्चन यांनाच भारतीय मुलांना वर्षानुवर्षे मिळणाऱ्या वागणुकीसाठी जबाबदार धरले. हर्ष थेट बिग बींना म्हणाला, "चित्रपटात तुमचे चारही मुलं वाईट निघाले, पण आमचा काय दोष? आम्ही इतकी वर्षे त्याची किंमत का मोजत आहोत?"
advertisement
advertisement
करवा चौथच्या व्रतामुळे पुरुषांना येतो ताण
हर्ष गुजरालने चित्रपटातील करवा चौथच्या प्रसिद्ध सीनवरही टीका केली. तो म्हणाला, "चित्रपटात तुम्ही करवा चौथचे व्रत का केले? आता देशातील सर्व पुरुष तणावात आहेत. बायका म्हणतात की, 'जर अमिताभ बच्चन व्रत ठेवू शकतात, तर तुम्ही कोण आहात?'" हर्षने प्रेक्षकांना हसवत सांगितले की, "अमिताभ सरांनी फक्त कॅमेरा चालेपर्यंतच उपवास केला होता आणि कट झाल्यावर त्यांनी फळे खायला सुरुवात केली असेल!"
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 5:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तुमची मुलं खराब निघाली तर आम्ही काय करू?' इन्फ्लूएन्सरने सर्वांसमोरच अमिताभ बच्चन यांना विचारला जाब, VIDEO VIRAL


