बाप शेर, तर लेक सव्वा शेअर! पंकज त्रिपाठी यांचं चाहत्यांना सरप्राइज, मुलीने शेअर केली मोठी Good News

Last Updated:

Pankaj Tripathi : कालिन भैय्या म्हणून देशभरात लोकप्रिय असलेल्या पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. या बातमीनंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

News18
News18
मुंबई : पंकज त्रिपाठी गेली २१ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. २००४ साली बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या पंकज त्रिपाठी यांना २०१२ साली आलेल्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातून ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. बिहारमधून मायानगरीत अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या आणि आज बॉलिवूड व ओटीटीवर आपल्या अभिनयाने राज्य करणाऱ्या पंकज त्रिपाठी यांना आता कोणत्याही ओळखीची गरज नाही.
आजवर अनेक भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं. गँगस्टरची भूमिका साकारलेले पंकज त्रिपाठी त्यांच्या साधेपणाने आपल्या चाहत्यांचं मन जिंकलं आहे. अशातच आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगीही मोठा धमाका करायला सज्ज झाली आहे. पंकज त्रिपाठी यांचा हा अभिनयाचा वारसा त्यांची लाडकी लेक आशी त्रिपाठी पुढे घेऊन जात आहे. पंकज त्रिपाठी यांनी नुकतेच आपले नवीन प्रॉडक्शन बॅनर लॉन्च केले असून, त्यांच्या पहिल्याच प्रोजेक्टमधून १८ वर्षांची आशी रंगभूमीवर पदार्पण करत आहे.
advertisement

'रूपकथा रंगमंच'ची सुरुवात

पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात थिएटरमधून केली होती आणि आता एका निर्माता म्हणून ते पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळले आहेत. पंकज त्रिपाठी यांनी पत्नी आणि बिझनेस मॅनेजर मृदुला त्रिपाठी यांच्यासोबत मिळून 'रूपकथा रंगमंच' नावाचे नवीन प्रॉडक्शन बॅनर सुरू केले आहे. 'रूपकथा रंगमंच' अंतर्गत त्यांचा पहिला थिएटर प्रोजेक्ट 'लैलाज' हा आहे.
advertisement

आशी त्रिपाठीचे थिएटर डेब्यू

'लैलाज' या नाटकामुळे पंकज त्रिपाठी आणि त्यांचे कुटुंब खूप उत्साहित आहे, कारण या नाटकाद्वारे त्यांची मुलगी आशी त्रिपाठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवणार आहे. पंकज त्रिपाठी यांची १८ वर्षांची मुलगी आशी त्रिपाठी या नाटकात मुख्य भूमिकेत लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन फैज मोहम्मद खान यांनी केले आहे.
advertisement
आशी त्रिपाठीने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्याची ही पहिली वेळ नाही. आशीने गेल्या वर्षीच मैनाक भट्टाचार्या यांच्यासोबत 'रंग डारो' या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते. आशी सहसा लाईमलाईटपासून दूर राहते, पण अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी तिची तयारी जोरदार सुरू आहे. सध्या ती म्युझिक व्हिडिओ आणि थिएटरमध्ये काम करत आहे, पण आता लोकांना तिच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बाप शेर, तर लेक सव्वा शेअर! पंकज त्रिपाठी यांचं चाहत्यांना सरप्राइज, मुलीने शेअर केली मोठी Good News
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement