Women's Day 2024 : महिला दिनानिमित्त वाचा या सुंदर कविता; मनात भरेल चैतन्य, नवी उमेद!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Mahila din kavita in marathi : महिलांचा आदर लक्षात घेऊन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. जर तुम्हाला कोणत्याही स्त्रीबद्दल आदर आणि सन्मान वाटत असेल आणि तुमच्या भावना तिच्यासमोर व्यक्त करायच्या असतील तर 8 मार्च हा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुमच्या आयुष्यातील महिलांना या कविता पाठवा आणि त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करा.
शक्ती जी तुमच्यामध्ये संपूर्ण दुनियेला दिसते, माझ्या नजरेतून पाहिलं तर मला दिसतं ते समर्पण.. प्रेमाचे, सेवेचे, करूणेचे, दयेचे, संरक्षणाचे समर्पण.. कितीही असो कठीण वाट, कायम राहते तुझी साथ.. कर्जदार कायम असू आम्ही तुमच्या प्रत्येक ऋणांचे, प्रत्येक वेळी देता योग्य मार्ग, आभारी आहोत आम्ही तुमच्या आयुष्यात असण्याचे.. आई, बहीण, मुलगी, पत्नी, प्रेमिका, शिक्षिका.. प्रत्येक रूपात असते तुमची साथ, महिला दिनी या मानतो तुमचे आभार, राहा कायम अशाच आयुष्यात! - दिपाली नाफडे. <a href="http://news18marathi.com/photogallery/lifestyle/happy-womens-day-2024-wishes-quotes-whatsapp-status-and-messages-in-marathi-8th-march-mhpj-1140689.html">जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</a>.
advertisement
स्त्रीचं असणं, नसणं दोन्ही सारखचं असतं, स्त्रीचं स्त्री म्हणून वागवून घेणं सोप असतं, पण त्या स्त्रीला स्त्री म्हणूनी वागायला लावणं मात्र कठीण असतं, स्त्रीच्या गर्भात नऊ महिने राहणं सोपं असतं, पण तेच स्त्रीच्या डोळयांनी बघितलेल्या नव्या जन्माचं मोठं पर्व असते, जरी स्त्रीला भातुकलीचा खेळ आवडला, तरी आकाशात उडणारे विमान मात्र तिला हवं असते.. - कोमल जगताप. <a href="https://news18marathi.com/lifestyle/womens-day-wishes-quotes-whatsapp-status-and-messages-in-marathi-mhpj-1138800.html">Women's Day Wishes In Marathi</a>
advertisement
advertisement
खोचते वीज पंखात, तरी पदात तिच्या सांडून चालली माया. ओठांत हसू गोंदून, उभी निक्षून, जणू आभाळ उभं पेलाया.. ती अनुरागाची ओल, हरवूनी तोल, स्वये शृंगार जिथे मोहरतो, ती समर्पणाची शर्थ, प्रितीचा अर्थ तिच्या त्या गात्रांतून पाझरतो. ती सती, रती, रेवती की तारामती, तिचा गं रोज निराळा गंध, ती नदी मत्त मोकळी, जी आतूर जळी तोडण्या सज्ज रुढींचे बांध.. - गरु ठाकूर
advertisement
या स्वार्थी जगाला, झालीस तू नकोशी. गर्भात खेळले ते सारे तुझ्या जीवाशी. जरी जन्मलीस येथे, होती गुलाम काया. टपले अनेक होते, हेरून घास घ्याया. नव्हतीस तू कधीही, येथे कुणी विशेष. कधी लाभला न येथे, पुरता तुला प्रकाश. तरीही <a href="https://news18marathi.com/tag/womens-day/">पुन्हा पुन्हा तू जगलीस या जगात</a>, तगली तुझ्यामुळे ही माणूस नाम जात.. - शैलेश हिंदळेकर
advertisement
आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेल गाव असतं, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही, जत्रा पांगते पाल उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात, आई मनामनात तशीच ठेउन जाते काही, जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही, आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा, घर उजळते तेव्हा तीच नसत भान विझून गेली अंधारात की, सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान, आई घरात नाही मग कुणाशी बोलतात, गोठ्यात हंबरणाऱ्या गाई? आई खरंच काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते.. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.. - फ. मु. शिंदे
advertisement
एकाच या जन्मीं जणू , फिरुनी नवी जन्मेन मी.. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा, भंवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता, ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी, हरवेन मी, हरपेन मी, तरीही मला लाभेन मी.. आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या फुलतील कोमेजल्यावाचुनी, माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी, या वाहणाऱ्या गाण्यांतुनी, लहरेन मी, बहरेन मी, शिशिरांतुनी उगवेन मी..


