1350 Sqft चा बंगला, 6.5 फूट जागेवरच उचलला, एक वीटही तोडली नाही! चिपळूणमधला अनोखा प्रयोग

Last Updated:
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये 1350 sqft चा एक बंगला जागेवरच, कोणतीही तोडफोड न करता 6.5 फूट उंच उचलण्यात आला आहे. चिपळूणमध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे. (राजेश जाधव, प्रतिनिधी)
1/8
घर पाहावे बांधून...अशी आपल्याकडे एक म्हण आहे. पण, बांधलेलं घर दुसऱ्या जागी किंवा आहे त्याच जागी 6.5 फूट उचललं तर? हे ऐकून दचकू नका. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये 1350 sqft चा एक बंगला जागेवरच कोणतीही तोडफोड न करता 6.5 फूट उंच उचलण्यात आला आहे. चिपळूणमध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे.

advertisement
2/8
2005 आणि 2021 च्या महापुरानंतर चिपळूणकर आजही पुराच्या भीतीखाली जगत आहेत. मात्र या भीतीवर मात करत चिपळूणमधील एका निवृत्त अभियंत्याने कोकणात पहिल्यांदाच आगळा-वेगळा प्रयोग करून दाखवला आहे.

3/8
तब्बल १५०  जॅकच्या सहाय्याने १३५० स्क्वेअर फुटाचे घर साडेसहा फूट उचलण्याचा हा प्रयोग सध्या यशाच्या मार्गावर आहे.

4/8
 चिपळूण तालुक्यातील खेंड परिसरात राहणारे निवृत्त अभियंता प्रमोद वेल्हाळ यांनी हा धाडसी निर्णय घेतला. 2005 आणि 2021 च्या महापुरात चिपळूण शहराला मोठा फटका बसला होता.

5/8
 विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत इमारतीला कोणतीही तडा-भेग किंवा नुकसान झालेले नाही.  घर पाडून नव्याने बांधण्यापेक्षा हा उपाय कमी खर्चिक आणि सुरक्षित असल्याचे वेल्हाळे सांगतात.

6/8
'ज्या घरात माझ्या पत्नीच्या आठवणी आहेत, ते घर पाडण्यापेक्षा उचलणेच योग्य वाटले,' अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. हा प्रयोग यशस्वी झाल्यास कोकणातील पूरग्रस्तांसाठी नवा आदर्श ठरणार आहे.

7/8
'घर कोसळवून पुन्हा बांधण्यापेक्षा ते सुरक्षितपणे उचलणे हा चांगला पर्याय आहे. कमी खर्चात हा उपाय शक्य आहे, त्यामुळे पूरग्रस्तांनी याचा विचार करावा.'  प्रमोद वेल्हाळे यांच्या या अभिनव प्रयोगाला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून नागरिक पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

8/8
पूर भीतीच्या छायेत जगणाऱ्या चिपळूणकरांसाठी हा प्रयोग नवी दिशा देणारा ठरत असून, शासनानेही अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावं, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement