हमालांचं हाल पाहून बनवली इलेक्ट्रिक हातगाडी, आता ओझं ओढण्याची गरजच नाही!
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधील एका इंजिनिअर तरुणानं हमालांसाठी खास हातगाडी तयार केलीय. विशेष म्हणजे ही हातगाडी ओढायची किंवा ढकलायची गरज नाही.
गरिबीमुळं दुसऱ्याचं ओझं ओढून पोटाची खळगी भरणारे अनेक हमाल आपण पाहिले असतील. हातगाडीवर ओझं ओढताना त्यांचे होणारे हाल बघवत नाहीत. मात्र, जगण्यासाठी त्यांना हे काम करावंच लागतं. अशा मजुरांचा भार काहीसा हलका करण्याचं मोठं काम छत्रपती संभाजीनगरमधील एका इंजिनिअर तरुणानं केलंय. हमाल काम करणाऱ्यांसाठी सुयोग चांडक यांनी खास इलेक्ट्रिक हातगाडी तयार केलीय. विशेष म्हणजे यासाठी त्यांना पेटंट देखील मिळालंय.
advertisement
सुयोग चांडक मूळचे छत्रपती संभाजीनगर शहराचे आहेत. सुयोग यांचे वडील इंजिनियर आहेत असून आई गृहिणी आहे. संपूर्ण शिक्षण त्यांनी संभाजीनगरमध्येच पूर्ण केलं. तर इंजीनियरिंगचं शिक्षणही शहरातील एमआयटी इंजीनियरिंग कॉलेजमधून पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे नोकरी केली. पण नोकरीत मन रमत नसल्याने त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा व्यवसाय चांगला जम बसला असून व्यवसाय उत्तम आहे, असे ते सांगतात.
advertisement
सुयोग यांना इलेक्ट्रिक हातगाडी बनवण्याची कल्पना लॉकडाऊनमध्ये सुचली. त्यांनी लॉकडाऊनमध्ये अनेक हातगाडी मजुरांना ओझं वाहून नेताना बघितलं. तेव्हा त्यांचं ओझं हलकं करण्यासाठी चांडक यांना इलेक्ट्रिक हातगाडीची कल्पना सुचली. 2021 मध्ये त्यांनी ही हात गाडी तयार करायला सुरुवात केली आणि साधारण आठ ते नऊ महिन्यांमध्ये ही हातगाडी तयार झाली, असंही चांडक यांनी सांगितलं.
advertisement
इलेक्ट्रिक हातगाडी तयार करताना अनेक अडचणी आल्या. सुयोग यांना ही हातगाडी बनवताना सर्वात मोठी अडचण होती ती हातगाडी बनवण्यासाठी कोणतं सामान वापरायचं? कारण जास्त महाग सामान वापरणं सामान्य मजुरांना परवडणारं नव्हतं. त्यामुळे त्यांना कमीत कमी किमतीचं पण चांगलं सामान वापरायचं होतं. ही त्यांना सर्वात मोठी अडचण होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे.
advertisement
इलेक्ट्रिक हातगाडी तयार झाल्यानंतर यासाठी त्यांनी पेटंट फाईल केलं. सुयोग यांचं म्हणणं होतं की कोणतीही गोष्ट पटकन कॉपी पेस्ट होते. जर इतर देशातून हीच हात गाडी आपल्या देशात आली तर आपलं स्वतःचं जे इनोवेशन आहे ते नाहीसं होईल. त्यामुळे मी पेटंट फाईल करायचं ठरवलं होतं. पेटंट फाईल केल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. त्रुटी सोडवल्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर म्हणजेच 28 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना पेटंट मिळालं.
advertisement
advertisement
यामध्ये शून्य ते 150 किलो, 150 किलो ते 300 किलो, 300 किलो ते 500 किलो आणि 500 किलोच्या वर ओझे अशी विभागणी केलीय. सध्याल या हातगाडीची किंमत ही 50 ते 60 हजार एवढी आहे. पण जेवढ्या कमी वजनाची हातगाडी असेल तेवढेच असेल. त्याप्रमाणे ह्या हात गाडीची कमी किंमत ठेवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असंही सुयोग चांडक यांनी सांगितलं. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी)


