Marathwada Weather: अरे देवा! मराठवाड्यावर पुन्हा संकट, 48 तास धोक्याचे, 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather update: अवकाळीने झोडपल्यानंतर 15 दिवसांतच मराठाड्यावर नवं संकट आलं आहे. छत्रपती संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
राज्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे. पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तापमानात मोठी घट होणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी हवामान विभागाकडून शीतलहरीचा इशारा देण्यात आला आहे. आज मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला. त्यामुळे या भागात थंडीची लाट जाणवण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये 16 नोव्हेंबर रोजी हवामान कसं राहील याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
advertisement
advertisement
हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यांना देखील 'कोल्ड वेव्ह'चा इशारा दिला आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारवा वाढण्याची शक्यता आहे. तसेच साधारणतः येथे वातावरण कोरडे राहणार आहे. तसेच आकाश निरभ्र असणार असून तापमानात पुढील तीन दिवसांत जास्त घट होणार आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
advertisement
advertisement
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड अशा एकूण सहा जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला असून 'कोल्ड वेव्हचा' इशारा देखील देण्यात आला आहे. पुढील 48 तास हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गरम कपडे परिधान करावेत, तसेच स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी.







