Marathwada Weather : पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Marathwada Weather : मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरलेला आहे. आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी देखील पावसाचा अंदाज असल्याची माहिती हवामान विभागाकडून वर्तवली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे धोक्याची पातळी जास्त असून काही ठिकाणी पाणी साचणे आणि दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण होऊ शकतात.
advertisement
advertisement
advertisement










