Marathwada Rain: मराठवाड्यात पुन्हा हवामानात बदल, आज मुसळधार की उघडीप? पाहा आजचा अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
मागील बऱ्याच दिवसांपासून पावसाने मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये हजेरी लावलेली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
हवामान विभागाच्या पुढील अंदाजानुसार, 12 ऑगस्टपासून पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचना लक्षात ठेवून पिकांची आणि स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करावी. पावसाच्या आगमनामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची भीती काही प्रमाणात दूर झाली असून शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी पुरेसा साठा होण्यास मदत होईल.


