सावधान, यंदा थंडी वाढणार! हिमालयातील ८६% प्रदेश बर्फाने झाकलेला; ११० वर्षांचा विक्रम मोडणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
यंदा हिमालयात वेळेआधी बर्फ, ला निना इफेक्टमुळे भारतात कडाक्याची थंडी, तापमान ३-४° सेल्सिअसने कमी, महाराष्ट्रात हलका पाऊस व हवामानात बदल.
यंदा अति पावसानंतर आता कडाक्याची थंडी जाणवणार आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत कडाक्याची हाडं गोठवणारी थंडी असणार आहे. 110 वर्षांत तिसऱ्यांदा यावेळी तीव्र थंडी राहणार आहे. हिमालयात यंदा 86 टक्के भाग हा वेळेआधीच दोन महिने आधीच बर्फाने झाकलेला आहे. हिमालयातील तापमान 3 अंश सेल्सिअसने कमी आहे.
advertisement
यावेळी प्रशांत महासागरात ला निनाचा इफेक्ट असणार आहे. त्यामुळे महासागरातील तापमान हे सामान्यापेक्षा कमी राहणार आहे. हे डिसेंबरमध्ये सक्रिय होईल. यामुळे यंदा भारतात कडाक्याची थंडी राहणार आहे. ला निना उत्तर, मध्य आणि पूर्वेकडील प्रदेशांमध्ये सरासरी तापमान ३-४° सेल्सिअसने कमी करू शकते.
advertisement
ऑक्टोबरच्या पहिल्याच महिन्यात कमी तापमान राहिलं आहे. ही मागच्या 26 वर्षांत असं घडण्याची तिसरी वेळ आहे. त्यामुळे यावेळी कडाक्याची थंडी राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात यावेळी वेळेआधीच थंडी आली आहे. राजस्थानमध्ये दिवसा उष्ण आणि रात्री थंड तापमान आहे. सिकरमध्ये रात्रीचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंद करण्यात आली.
advertisement
दिव्य मराठीनं दिलेल्या वृत्तानुसार डॉ. मेहता यांच्या मते, अलिकडच्या बर्फवृष्टीवरून हिमनद्यांचे आरोग्य सुधारत असल्याचेही दिसून येते. हिमालयातील तापमान कमी असल्याने, यावेळी बर्फ वितळत नाही ही चांगली गोष्ट आहे. यामुळे पाच वर्षे हिमनद्या रिचार्ज होतील. उत्तर भारतातील नद्यांचे स्रोत कोरडे पडणार नाहीत.
advertisement
122 वर्षांत सरासरी तापमान 0.99 अंशांनी वाढलं आहे. मात्र 2025 मध्ये तापमान वाढ होणार नाही तर ला निनामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात तूर्तास तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. १५-१६ ऑक्टोबर रोजी दक्षिणेकडील भागात सतर्कतेचा इशारा
advertisement
काही शहरांमध्ये तापमानात चढ उतार होत आहेत. महाराष्ट्रात उष्ण आणि ढगाळ वातावरण आहे. 20 ऑक्टोबरनंतर हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज वर्तवला तर, तापमानात फारसा बदल होणार नाही.
advertisement