Jalgaon News : लोकसभेपूर्वी जळगावात ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त; पोलिसांची इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

Last Updated:
Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमित जळगाव पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी)
1/5
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र जळगाव जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने गस्तीवर असलेल्या जळगाव जिल्हा पोलीस दलाने भुसावळ शहरात एमडी ड्रगवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल 73 लाख रुपये किमतीचे 910 ग्रॅम एवढं एमडी ड्रग जप्त केल आहे.

advertisement
2/5
या कारवाईत पोलिसांनी भुसावळ शहरातीलच रहिवासी असलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. कुणाल भारत तिवारी वय 30, जोसेफ जॉन वाल्याड्यारेस व दीपक मुकेश मालवीय अशी अटकेतील तिघा आरोपींची नावे आहेत.

3/5
या तिघांकडून तब्बल 910 ग्रॅम एवढे 73 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

4/5
जळगाव जिल्ह्याचे इतिहासातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलीस अधीक्षक महेश्र्वर रेड्डी यांनी बोलताना सांगितलं आहे.

5/5
मोठी कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला पोलीस अधीक्षकांकडून 20 हजार रुपयांचा रिवार्ड देण्यात आला आहे. या रॅकेटचा इतर जिल्ह्यांशी किंवा इतर घटनांची काही संबंध आहे का? याचा जिल्हा पोलीस दलाकडून कसून तपास केला जात आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement