कोल्हापुरात विचित्र अपघात, पाच गाड्या धडकल्या, कार ट्रकच्या चाकाखाली, तरीही सगळे वाचले! कुणाचाच विश्वास बसेना!

Last Updated:
Kolhapur Accident News: कोल्हापूर शहरातील केएसबीपी चौकातून सायबर चौकाकडे येणाऱ्या ऊसाच्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटुन ट्रक डिव्हायडरला धडकला.
1/5
कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. तब्बल पाच ते सहा गाड्यांच्या थरारक अपघाताने कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला. सुदैवाची गोष्ट म्हणजे २० ते २५ लोकांपैकी कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, जीवितहानीही झाली नाही.

advertisement
2/5
शहरातील केएसबीपी चौकातून सायबर चौकाकडे येणाऱ्या ऊसाच्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटुन ट्रक डिव्हायडरला धडकला. ट्रॅफिक सिग्नलला थांबलेल्या चार कारसह एका टेम्पोला ट्रेकने धडक दिली. त्यानंतर याच ट्रकने एका बसला अलगद ठोकर दिली.

3/5
अपघातात ट्रक चालकासह कार आणि टेम्पोतील चौघे किरकोळ जखमी झाले. बसमध्ये जवळपास २० ते २५ माणसे होती. मात्र सुदैवाने यातील कुणालाही गंभीर जखम झाली नाही.

4/5
अपघातात ट्रकखाली कार सापडून तिचा चक्काचूर झाला. मात्र नशिब बलवत्तर म्हणून कारमधील सुनील रेडेकर हे थोडक्यात बचावले. त्यांना दुचाकीवरील दोन तरुणांनी तातडीने कारच्या काचा फोडून बाहेर काढले.

5/5
राजारामपुरी पोलिस आणि शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जखमींना बाहेर काढले. मंगळवारी रात्री साडे सातच्या सुमारास झालेल्या अपघाताची शहरात नाक्यानाक्यावर चर्चा सुरू होती.

Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement