Kolhapur Rain: कोल्हापूरला धोक्याची घंटा! विजांचा कडकडाट होणार, 3 तासात वादळी पाऊस झोडपणार
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Kolhapur Weather: कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. या काळात विजांचा धोका लक्षात घेता नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
advertisement
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी आणि गगनबावडा या तालुक्यांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. या प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
advertisement
advertisement
जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. पूरग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांना नदीकाठ, खोलगट भाग आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि वीज पडण्याची शक्यता लक्षात घेऊन उघड्यावर थांबणे किंवा झाडाखाली आश्रय घेणे धोकादायक ठरू शकते.
advertisement
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा किंवा स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधावा. वाहिन्या आणि हवामान खात्याच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवावी आणि पाण्याने वेढलेल्या भागातून प्रवास करणे टाळावे, असेही प्रशासनाने सांगितले आहे.










