Kolhapur Rain: कोल्हापूरला वादळी पावसाने झोडपले, पन्हाळ्यात शिळा कोसळल्या, पुढील 72 तासांसाठी अलर्ट
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Kolhapur Rain: कोल्हापूर जिल्ह्यात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
गेल्या काही दिवसांत कोल्हापुरातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोल्हापूर शहरासह घाटमाथ्याच्या परिसरात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी सायंकाळी पन्हाळा परिसराला पावसाने झोडपले. पहिल्याच पावसात पन्हाळगडावर येणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन मोठ्या शिळा कोसळल्याने काही वेळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
advertisement
थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या पन्हाळ्यावर उष्णतेची तीव्रता चांगलीच वाढली होती. त्यामुळे गडावरील पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या कमी झालीये. रविवारी सकाळपासूनच वातावरणात बदल दिसून येत होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. अघ्या एका तासात 22 मि.मी. नोंद झाली.
advertisement
पावसामुळे उष्म्यापासून दिलासा मिळाला असला, तरी यामुळे काही अडचणीही निर्माण झाल्या. दुपारपासूनच वीज मंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा खंडित केला होता. पावसामुळे झाडांची पडझड झाली नसली, तरी मुख्य रस्त्यावर दोन मोठ्या शिळा कोसळल्या. यामुळे पन्हाळगडावर येणारा-जाणारा रस्ता काही वेळासाठी बंद ठेवण्यात आला.
advertisement
पावसामुळे उष्म्यापासून दिलासा मिळाला असला, तरी यामुळे काही अडचणीही निर्माण झाल्या. दुपारपासूनच वीज मंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा खंडित केला होता. पावसामुळे झाडांची पडझड झाली नसली, तरी मुख्य रस्त्यावर दोन मोठ्या शिळा कोसळल्या. यामुळे पन्हाळगडावर येणारा-जाणारा रस्ता काही वेळासाठी बंद ठेवण्यात आला. कोल्हापूरसह घाटमाथ्याच्या भागात आज पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे. ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असून 3 दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पावसाचा अंदाज आहे.
advertisement










