महाराष्ट्रातील या शहरात आहे निजामकालीन मॉल, वास्तू रचना पाहून थक्क व्हाल
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मध्यभागी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि बाजूला मार्केट उभारण्यात आले.
विविध वस्तू एकाच छताखाली मिळणारी मॉल संस्कृती आपल्या चांगलीच परिचयाची असेल. अलीकडच्या काळात असे मॉल प्रत्येक शहरात आणि मोठ्या खेड्यातही दिसत आहेत. परंतु, या मॉल संस्कृतीची सुरुवात भारतात 19 व्या शतकात झाली. महाराष्ट्रातील लातूर शहरात निजामशाही राजवटीत पहिल्यांदा अशी बाजारपेठ तयार करण्यात आली. लातूरमधील गंजगोलाई मार्केट हा शहर रचना आणि वास्तू कलेचा उत्कृष्ठ नमुना मानला जातो.
advertisement
advertisement
advertisement
लातूरची गोलाई एतद्देशीय लोकांनी त्यांच्या कल्पनेतून उभी केली. या स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या जागेची मागणी निजामाकडे केली. त्याकाळी लातूरची पेशकारी औशावरून चालत होती. तिथले पेशकार सुजामत अली यांच्या मदतीने हैद्राबाद निजाम दरबारी मागणी पोहचवली व जागा उपलब्ध करून घेतली. पुढे 1945 ला परदेशावरून आलेल्या फय्याजुद्दीन या वास्तूरचनाकाराच्या मदतीन कच्ची गोलाई पक्की झाली. या व्यापारी पेठेची ख्याती देशभर पसरली त्यातून गंजगोलाई आणि तीचे वैशिष्ट्य देशभर पसरले.
advertisement
लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली. मध्यभागी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि बाजूला मार्केट उभारण्यात आले. 8 जून 1917 रोजी गंजगोलाईचे उद्घाटन करण्यात आले. निजाम काळातील सुभेदारी म्हणजे आयुक्त कार्यालय गुलबर्गा येथे होते. त्याचे सुभेदार राजा इंद्रकरण यांच्या हस्ते गंजगोलाईचे उद्घाटन झाले आणि देशातील पहिलीच गोलाकार बाजारपेठ उभी राहिली.
advertisement
लातूरमध्ये असणाऱ्या गंजगोलाईचा अर्थ त्याच्या नावातच आहे. गंज हा उर्दू शब्द असून त्याचा अर्थ वस्तू बाजार असा होतो. अर्थात वस्तूंची गोल बाजारपेठ असा याचा अर्थ आहे. ही बाजारपेठ 16 रस्त्यांनी जोडण्यात आली आहे. या 16 रस्त्यावर ठोक व्यापारी दुकाने आहेत. एक रस्ता फक्त सोनारासाठी म्हणजे सराफ लाईन, दुसरा रस्ता फक्त कापड दुकान ती कापड लाईन, एक लाईन अन्नधान्याची भुसारलाईन, असे 16 रस्ते सोळा ठोक व्यापाराच्या लाईन आहेत.
advertisement
लातूरला गंजगोलाई बाजारपेठ उभी राहिल्यानंतर तसाच प्रयत्न देशात इतरत्रही झाला. गंजगोलाई भारतीय लोकांनी उभारली होती. परंतु, त्यानंतर दिल्लीत 1921 ला ब्रिटिश अधिकारी एडविन लुटनेस यांनी गोल मार्केट वसविले. कमी जागेत अधिक दुकानें दळणवळणासाठी सोयीस्कर ठरतात म्हणून ही रचना केली. पुढे 1925 मध्ये रायपूरलाही गोल मार्केट ब्रिटिशांनी वसविले.