आधीच धो धो पाऊस, त्यात अतिवृष्टीचा इशारा; साताऱ्यातील धबधब्यावर 5 दिवस जाण्यास बंदी
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
हवामानशास्त्र विभागानं 1 ते 5 ऑगस्टदरम्यान साताऱ्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली असून रेड आणि ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. आधीच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आणखी पाऊस पडल्यास कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. (शुभम बोडके, प्रतिनिधी / सातारा)
advertisement
महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा आणि भिलार धबधबा, इतर पर्यटनस्थळं, पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा) आणि सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे, कास तलाव तसंच जावळी तालुक्यातील ऐकीव या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक <a href="https://news18marathi.com/maharashtra/satara/unique-shivling-at-mahadev-temple-in-satara-msbs-mhij-1221483.html">आवर्जून</a> हजेरी लावतात.
advertisement
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी <a href="https://news18marathi.com/money/agriculture/damage-to-agricultural-crops-and-farm-land-in-satara-district-due-to-heavy-rains-1224033.html">साताऱ्यातील</a> वरील धबधबे आणि जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, 2 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान पर्यटकांना याठिकाणी जाण्यास तात्पुरत्या स्वरूपात बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
advertisement
पर्यटनस्थळी जाणारे मार्ग बंद करावे, आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा. त्यासाठी होमगार्ड विभागाची मदत घ्यावी. नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात आवश्यक ती कठोर कारवाई करावी. संबंधित कार्यकारी दंडाधिकारी व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून स्वतंत्र प्रतिबंधात्मक आदेश पारित करून त्यांची अंमलबजावणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पोलीस विभाग, महसूल विभाग, वन विभाग, ग्रामविकास विभाग आणि नगरपालिका विभागांनी संयुक्तरित्या उक्त आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करावी, असं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हटलंय.
advertisement


