Thane Car Fire PHOTO: देव तारी त्याला कोण...! गाडीतून अचानक निघाला धूर, बाजूला करेपर्यंत पेटली मारुती सुझुकी

Last Updated:
मुंबई-नाशिक रोडवरील तीन हात नाका सिग्नलजवळ मारुती सुझुकी झेन कारला अचानक आग लागली, राजू अप्पाकायला यांच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली, वाहतूक कोंडी झाली.
1/7
प्रेम मोरे, प्रतिनिधी ठाणे: जैसलमेर इथे बसला आग लागल्याची घटना डोळ्यासमोर असतानाच ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला. कारमधून अचानक धूर येऊ लागल्यानं चालक घाबरला. त्याने तातडीनं कार बाजूला घेतली. त्यानंतर जे घडलं ते एका वाईट स्वप्नापेक्षाही कमी नसावं, इतकी भयंकर ही घटना होती.

advertisement
2/7
देव तारी त्याला कोण मारी असा प्रत्यय त्याला आला. गाडीतून पाय बाहेर काढला आणि उतरेपर्यंत गाडीला मोठी आग लागली. पुढच्या काही क्षणात गाडीने पेट घेतला. याची माहिती तातडीनं अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली.

3/7
मुंबई-नाशिक रोडवरील तीन हात नाका सिग्नलजवळ आज सकाळी एका मारुती सुझुकी झेन (MH ०२ VA ३३२९) गाडीला अचानक आग लागण्याची घटना घडली. मात्र, चालक राजू अप्पाकायला यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

4/7
ठाणे शहरातून मुंबईकडे येत असताना राजू अप्पाकायला यांना गाडीतून धूर येताना दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी तात्काळ रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि ते गाडीतून बाहेर पडले. ते बाहेर येताच काही क्षणातच आगीने वेगाने संपूर्ण गाडीला वेढले.

5/7
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि नौपाडा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ रस्ता बंद करून आग विझवण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

6/7
चालकाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे काही काळ मुंबई-नाशिक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं मात्र कारचं मोठं नुकसान झालं आहे.

7/7
हे फोटो पाहून घटना किती भीषण असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement