सोनं 150 टन, किंमत 36000 कोटी; बांधावरुन शेतकऱ्यानं जे काही पाहिलं, त्यामुळे झाला मालामाल, आता सर्वत्र होतेय चर्चा

Last Updated:

52 वर्षीय शेतकरी हे रोजच्यासारखे आपल्या पडीक शेताच्या बांधावर फेरफटका मारत होते. तेव्हा हा प्रकार त्यांच्यासोबत घडला

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : दररोज शेतात जाणं, पिकांकडे लक्ष देणं, खत-पाणी घालणं ही प्रत्येक शेतकऱ्याची सवयच असते. पण विचार करा, जर एका साध्या शेतफेरीदरम्यान शेतकऱ्यासमोर असं काही आलं की त्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं? अगदी असंच काहीसं घडलं एका शेतकऱ्याच्या आयुष्यात आणि आज जगभरात त्याच्याच चर्चेला उधाण आलं आहे.
52 वर्षीय शेतकरी मिशेल ड्यूपॉन्ट हे रोजच्यासारखे आपल्या पडीक शेताच्या बांधावर फेरफटका मारत होते. संध्याकाळचे सूर्यकिरण जमिनीवर पडलेले, हवा शांत... आणि तेव्हाच त्यांच्या नजरेस काहीतरी पिवळं आणि झळाळतं दिसलं. उत्सुकतेपोटी त्यांनी फावडं मारून थोडं खोदायला सुरुवात केली आणि जे समोर आलं, ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
कारण जमिनीखालून बाहेर आलं होतं खरं सोनं आणि तेही थोडं नव्हे तर शेकडो किलोचं! तपासणीदरम्यान तज्ज्ञांनी सांगितलं की, त्या जमिनीखाली तब्बल 150 टन सोनं पुरलेलं आहे, ज्याची किंमत तब्बल 36,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. हे प्रकरण फ्रान्समधील ऑवेर्गने भागातील आहे.
advertisement
ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ माजली. बघ्यांची गर्दी वाढली, आणि बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. मात्र, आता प्रश्न असा निर्माण झाला की हे सोनं अखेर मिळणार कोणाला?
फ्रान्सच्या कायद्यानुसार, जमिनीत काही मौल्यवान वस्तू सापडल्यास ती सरकारला कळवणं आवश्यक असतं. त्यामुळे सरकारने लगेचच ती जागा सील करून तपास सुरू केला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत तिथे खोदकाम करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
advertisement
दरम्यान, काही गुंतवणूकदारांनी ती जमीन विकत घेण्यासाठी मोठ्या ऑफर्स दिल्या आहेत, पण मिशेल ड्यूपॉन्ट अजूनही गोंधळात आहेत हे सोनं त्यांचं नशिब बदलणार का की सरकार घेऊन जाणार?
view comments
मराठी बातम्या/मनी/
सोनं 150 टन, किंमत 36000 कोटी; बांधावरुन शेतकऱ्यानं जे काही पाहिलं, त्यामुळे झाला मालामाल, आता सर्वत्र होतेय चर्चा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement