Weight Loss: चिया सीड्स की भोपळ्याच्या बिया; वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Weight Loss: तुम्ही हेल्दी डाएट फॉलो करत असाल, तर तुम्ही भोपळ्याच्या बिया आणि चिया सीड्स यांचाही आहारात समावेश करायला हवा. या दोन्हीत पोषक तत्वे भरपूर आहेत. पण या दोनपैकी वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त मदत कोण करते, हे तुम्हाला माहीत आहे का?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चिया आणि भोपळ्याच्या बिया या दोन्हीमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी हे दोन्ही सीड्स मदतगार मानले जातात. तुम्ही यापैकी कोणत्याही एकाचा किंवा दोन्हीचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. फायबरमुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता. प्रोटीनमुळे चयापचय सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
advertisement