'माझ्याकडे भीक मागत होता सलमान आणि आता...', पुन्हा भाईजानशी भिडला अभिनव कश्यप, खुल्लमखुल्ला घेतला पंगा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Salman Khan-Abhinav Kashyap controversy : बॉलिवूडचा हिरो दबंग सलमान खान याच्याशी वैर पत्करणे अनेकांना महागात पडले आहे, पण दिग्दर्शक अभिनव कश्यपने मात्र सलमान खानला थेट आव्हान दिले आहे.
मुंबई : बॉलिवूडचा हिरो दबंग सलमान खान याच्याशी वैर पत्करणे अनेकांना महागात पडले आहे, पण दिग्दर्शक अभिनव कश्यपने मात्र सलमान खानला थेट आव्हान दिले आहे. 'बिग बॉस १९' मध्ये सलमानने अभिनवच्या टीकेला मिश्किल पण सडेतोड उत्तर दिल्यानंतर, आता अभिनवने पुन्हा एकदा सलमानवर अत्यंत गंभीर आणि वैयक्तिक हल्ले केले आहेत.
सलमान खानसारखा गुंड सैनिकाची भूमिका पार पाडतो हे हास्यास्पद
एका मुलाखतीत अभिनव कश्यपने सलमान खानला आव्हान देत वादग्रस्त विधाने केली आहेत. तो म्हणाला, "सलमान आता पलटून काही बोलणार नाही, ही केवळ एक काल्पनिक परिस्थिती असू शकते. उद्या तो मला गोळीही मारू शकतो."
अभिनवने सलमानवर आरोप केला की, "सलमानने स्वतःचे आयुष्य इतके उद्ध्वस्त केले आहे की ते आता वाचवता येणार नाही. त्याची अडचण ही आहे की तो मला पैशांनी विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याचा उपयोग होत नाहीये." सलमान खानसारखा गुन्हेगार पडद्यावर सैनिकाची भूमिका साकारतो, हे विचित्र आहे, असेही अभिनव कश्यपने म्हटले आहे.
advertisement
सलमान खानने माझ्याकडे भीक मागितली
अभिनव कश्यप एवढ्यावरच थांबला नाही. त्याने 'दबंग' चित्रपटाच्या वेळी घडलेला एक धक्कादायक किस्सा सांगितला. तो म्हणाला, "मीच तो माणूस आहे, ज्याने सलमानला 'दबंग'मधून मोठा ब्रेक दिला."
advertisement
तो पुढे म्हणाला, "सलमानने माझ्यापुढे एका चित्रपटासाठी भीक मागितली होती. राम-राम म्हणून त्याने माझ्याकडे चित्रपटाची मागणी केली. यानंतर मी त्याला 'दबंग'मध्ये कास्ट करून मोठी संधी दिली, पण त्याने माझ्या पाठीत खंजीर खुपसला." हे सर्व सत्य आहे आणि मी तेच बोलत आहे, असे अभिनवने ठामपणे सांगितले.
अभिनववर सलमानचा सणसणीत पलटवार
यापूर्वी अभिनव कश्यपच्या वक्तव्यांना उत्तर देताना सलमान खानने 'बिग बॉस १९' मध्ये त्याला थेट सवाल केला होता. "कामावरून आठवलं... काम मिळालं का रे भाऊ?" असा प्रश्न सलमानने त्याला विचारला होता. सलमानने अभिनवला सल्ला दिला होता की, इतरांबद्दल वाईट बोलण्याऐवजी त्याने कामावर लक्ष केंद्रित करावे. अन्यथा, ज्यांची नावे तो घेत आहे, ते लोक आयुष्यात त्याच्यासोबत कधीही काम करणार नाहीत." आता अभिनवने पुन्हा एकदा हल्ला केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 9:21 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझ्याकडे भीक मागत होता सलमान आणि आता...', पुन्हा भाईजानशी भिडला अभिनव कश्यप, खुल्लमखुल्ला घेतला पंगा