VIDEO : दिवाळीच्या खरेदीत घाटकोपरमध्ये धक्कादायक घटना, 50 सेकंदात ज्वेलर्सला लुटलं, घटनाक्रम कॅमेरात कैद
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबईच्या घाटकोपरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दिवसाढवळ्या ज्वेलर्समध्ये घुसून तीन तरूणांनी चाकूचा धार दाखवून दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. अवघ्या 50 सेकंदात या चोरट्यांनी ज्वेलर्स लुटली आहे.
Mumbai Ghatkoper jewellery Robbery Video : मुंबईच्या घाटकोपरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दिवसाढवळ्या ज्वेलर्समध्ये घुसून तीन तरूणांनी चाकूचा धार दाखवून दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. अवघ्या 50 सेकंदात या चोरट्यांनी ज्वेलर्स लुटली आहे. घाटकोपरमधील गोळीबार रोड परिसरात सकाळच्या सूमारास ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे.त्यामुळे या घटनेने दिवाळीच्या तोंडावर घाटकोपर हादरलं आहे.
घाटकोपरच्या गोळीबार परिसरात दर्शन मेटकरी यांच दर्शन ज्वेलर्स नावाचं ज्वेलर्सच दुकान आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळच्या सुमारास त्यांनी दुकान उघडलं होतं आणि ते ग्राहकांची वाट पाहत होते.या दरम्यान दुचाकीवरून आलेले तीन तरूण मास्क घालून थेट दुकानात शिरले.यामधील एकाच्या हातात चाकू होता.या चाकूच्या माध्यमातून त्यांनी दर्शन मेटकरी यांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान इतर दोन आरोपींनी झटपट दागीने बॅगेत भरायला सूरुवात केली होती.
advertisement
पण दर्शन मेटकरी यांनी चाकुला न घाबरता थेट विरोध केला. या दरम्यान आरोपीने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यामध्ये दर्शन मेटकरी गंभीर झाले होते.या हल्ल्यानंतर आरोपींनी पळून गेले होते.यावेळी मेटकरी यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता,पण आरोपींनी पळ काढला होता. ही संपूर्ण घटना ज्वेलर्समध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. दर्शन मेटकरी यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सूरू आहेत. घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सूरू केला आहे.
पोलिस उपायुक्त राकेश ओला यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दरोडेखोर सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान दर्शन ज्वेलर्स मध्ये घुसले. त्यांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. काही दागिने लुटले, मात्र दुकानचे मालक दर्शन मिटकरी यांनी विरोध केला. त्यामुळे दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि बाहेर पळाले. तिघांपैकी दोन जण दुचाकी वर पळून गेले तर एक जण हातात बंदूक घेऊन पळत निघाला. तिसऱ्या दरोडेखोराने नागरिकांना भीती दाखविण्यासाठी आपल्या बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या आणि इंदिरा नगरच्या डोंगरावर पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम, गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. भरदिवसा अशा प्रकारचा दरोडा आणि गोळीबार होतो, त्यामुळे या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे परिसरात आता भीतीचं वातावरण पसरलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 9:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : दिवाळीच्या खरेदीत घाटकोपरमध्ये धक्कादायक घटना, 50 सेकंदात ज्वेलर्सला लुटलं, घटनाक्रम कॅमेरात कैद