टीम इंडिया पर्थमध्ये पोहोचताच ऑस्ट्रेलियाचा माईंड गेम सुरू, कॅप्टनने केला विराट-रोहितचा अपमान!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजला 19 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे, ज्यासाठी भारतीय टीम ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजला 19 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे, ज्यासाठी भारतीय टीम ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. भारतीय टीम पर्थमध्ये पोहोचण्याच्या आधीच ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार पॅट कमिन्सने माईंड गेम खेळायला सुरूवात केली आहे. कमिन्सने भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या वनडेमधल्या सर्वकालीन प्लेयिंग इलेव्हनची घोषणा केली आहे, यामध्ये त्याने विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांचं नाव घेतलं नाही. विराट आणि रोहितला आपल्या टीममध्ये न घेण्याचं कारणही कमिन्सने सांगितलं आहे.
पॅट कमिन्सच्या या टीमचं नेतृत्व रिकी पॉण्टिंगकडे आहे. रिकी पॉण्टिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने लागोपाठ 2 वर्ल्ड कप जिंकले. याशिवाय ओपनर म्हणून कमिन्सने डेव्हिड वॉर्नर आणि सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं आहे. सहाव्या क्रमांकावर मायकल बेवनला संधी दिली आहे.
कमिन्सच्या टीममध्ये 3 भारतीय
पॅट कमिन्सने निवडलेल्या टीममध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूच सर्वाधिक आहेत. भारताच्या फक्त 3 खेळाडूंना त्याने संधी दिली आहे. कमिन्सने एमएस धोनीचं खास कौतुक केलं आहे, तसंच धोनीचा उल्लेख त्याने बेस्ट फिनिशर असा केला आहे. कमिन्सच्या टीममध्ये धोनीला सातव्या क्रमांकावर बॅटिंग आणि विकेट कीपिंगची जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच बॉलिंगमध्ये झहीर खान, ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली आणि शेन वॉर्न यांचा समावेश आहे. रोहित आणि विराटची या टीममध्ये निवड केली नाही, कारण दोघंही अजून निवृत्त झाले नसल्याचं कमिन्स म्हणाला आहे.
advertisement
भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये पॅट कमिन्स खेळताना दिसणार नाही. पाठीच्या दुखापतीमुळे कमिन्स फक्त भारताविरुद्धची सीरिजच नाही तर ऍशेसच्या काही मॅचही मुकण्याची शक्यता आहे.
कमिन्सच्या टीममध्ये कोण?
डेव्हिड वॉर्नर, सचिन तेंडुलकर, रिकी पॉण्टिंग, स्टिव्ह स्मिथ, शेन वॉटसन, मायकल बेवन, एमएस धोनी, ब्रेट ली, शेन वॉर्न, झहीर खान, ग्लेन मॅकग्रा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. वनडे सीरिजसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माचं भारतीय टीममध्ये कमबॅक झालं आहे. मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळल्यानंतर विराट आणि रोहित पहिल्यांदाच टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 11:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडिया पर्थमध्ये पोहोचताच ऑस्ट्रेलियाचा माईंड गेम सुरू, कॅप्टनने केला विराट-रोहितचा अपमान!