ऑस्ट्रेलियाचं विमान पकडताच टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे स्टार खेळाडू घरी परतला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताची वनडे टीम रवाना झाली आहे. 19 ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 3 वनडे मॅचची सीरिज सुरू होणार आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताची वनडे टीम रवाना झाली आहे. 19 ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 3 वनडे मॅचची सीरिज सुरू होणार आहे. वनडे सीरिजनंतर दोन्ही देशांमध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज होईल. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचं विमान पकडण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टी-20 टीमचा भाग असलेला स्टार ऑलराऊंडर शिवम दुबे याला दुखापत झाली आहे. शिवम दुबे कधी फिट होईल, याबाबत अजून कोणतीही अपडेट मिळालेली नाही.
रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा पहिला सामना जम्मू काश्मीरविरुद्ध बुधवारी सुरू झाला, पण या सामन्याआधीच मुंबईचा ऑलराऊंडर शिवम दुबे याला पाठीच्या दुखापतीचा त्रास सुरू झाला, त्यामुळे तो मंगळवारी रात्री मुंबईमध्ये परतला आहे, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्राने दिल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. शिवम दुबे टीमसोबत प्रवास करत होता, पण थंड हवामानामुळे त्याच्या पाठीची समस्या आणखीनच बिकट झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तो विश्रांती घेत आहे, त्यामुळे तो मंगळवारी मुंबईला परतला, असं एमसीएच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
advertisement
गेल्या महिन्यात भारताच्या आशिया कप विजयात शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली. स्पिनरविरुद्ध त्याची आक्रमक बॅटिंग टीमसाठी ट्रम्प कार्ड ठरली. भारतीय टी-20 टीमचा भाग असूनही, दुबे गेल्या काही हंगामांपासून मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळतो.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळला जाईल, त्यानंतर पुढील दोन सामने अॅडलेड आणि सिडनी येथे खेळले जातील. त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 सीरिज होईल. टी-20 सीरिजसाठी भारतीय टीम 22 ऑक्टोबरला रवाना होईल. 29 ऑक्टोबरपासून टी-20 सीरिजला सुरूवात होणार आहे.
advertisement
विराट-रोहितचं 7 महिन्यांनी कमबॅक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार आहेत. तब्बल 7 महिन्यांनंतर विराट आणि रोहित टीम इंडियाकडून मैदानात उतरणार आहेत. याआधी दोघंही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये एकत्र दिसले होते. आता पुन्हा एकदा दोघांना एकत्र पाहण्याची भारतीय क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 11:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ऑस्ट्रेलियाचं विमान पकडताच टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे स्टार खेळाडू घरी परतला!