Commonwealth Games: 20 वर्षांनंतर भारतात होणार कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन, अहमदाबादमध्ये भरणार खेळाचा मेळा!

Last Updated:

राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाने २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून शिफारस केली आहे.

News18
News18
गुजरात:  भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल २० वर्षांनंतर भारत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाने २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून शिफारस केली आहे. अहमदाबादला २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद देण्याचा अंतिम निर्णय २६ नोव्हेंबर रोजी ग्लासगो इथं होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा महासभेच्या बैठकीत घेतला जाईल. भारताने यापूर्वी २०१० मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
भारताला नायजेरियाकडून स्पर्धेचा सामना करावा लागला होता, परंतु राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या आफ्रिकन देशाच्या भविष्यातील खेळांच्या यजमान महत्त्वाकांक्षांना "समर्थन आणि गती देण्यासाठी एक धोरण विकसित" करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये २०३४ च्या खेळांचे आयोजन करण्याचा विचार करण्याचा समावेश आहे.
advertisement
भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी या निर्णयाबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केलं. अमित शाह यांनी  सोशल मीडियावर ट्विट करून  'हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतासाठी प्रचंड आनंद आणि अभिमानाचा दिवस. राष्ट्रकुल संघटनेनं अहमदाबादमध्ये २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या भारताच्या बोलीला मान्यता दिल्याबद्दल भारतातील प्रत्येक नागरिकाचे हार्दिक अभिनंदन. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांचे भव्य समर्थन आहे.' असं अमित शाह आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.
advertisement
कॉमनवेल्थ गेम्सकडून एका प्रेस रिलीज प्रसिद्ध करण्यात आलं आहे.  “कॉमनवेल्थ गेम्स एक्झिक्युटिव्ह बोर्डाने आज पुष्टी केली आहे की ते २०३० च्या  कॉमनवेल्थ गेम्ससाठी प्रस्तावित यजमान शहर म्हणून अहमदाबाद, भारताची शिफारस करेल.” रिलीजनुसार, “अहमदाबादला आता पूर्ण कॉमनवेल्थ गेम्स सदस्यत्वासाठी प्रस्तावित केले जाईल, ज्याचा अंतिम निर्णय २६ नोव्हेंबर रोजी ग्लासगो येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स जनरल असेंब्लीमध्ये घेतला जाईल.” भारताने २०१० च्या सत्राचे आयोजन नवी दिल्लीत केलं होतं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Commonwealth Games: 20 वर्षांनंतर भारतात होणार कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन, अहमदाबादमध्ये भरणार खेळाचा मेळा!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement