Beed Accident : अंत्यविधी सुरू असताना पिकअप गर्दीत घुसला, एकाचा जागीच मृत्यू तर 10 जण गंभीर

Last Updated:

बीड जवळील पाली येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू असतानाच अचानक भरधाव पिकअप घुसल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे अंत्यविधी कार्यक्रमात अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संभाजी विठ्ठलराव जाधव असे त्यांचे नाव आहे.

beed accident
beed accident
Beed Accident News : सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्काकदायक घटना समोर आली आहे. या घटनेत बीड जवळील पाली येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू असतानाच अचानक भरधाव पिकअप घुसल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे अंत्यविधी कार्यक्रमात अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संभाजी विठ्ठलराव जाधव असे त्यांचे नाव आहे. तर या घटनेत 10 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयासह इतर खाजगी रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हायवेला लागूनच पाली परिसरात स्मशान भूमी आहे. या स्मशान भूमीत स्वर्गीय आसराबाई किसनराव नवले यांचा अंत्यविधी सुरू होता.या दरम्यान एका भदधाव कंटेनरने एका महिलांनी भरलेल्या पिकअपला जोराची धडक दिली होती.त्यामुळे पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटून तो थेट रस्ता सोडून अंत्यविधी कार्यक्रमात घुसून मोठा अपघात झाला होता.या अपघातात आता संभाजी विठ्ठलराव जाधव या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 8 ते 10 जण या अपघातात गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयासह इतर खाजगी रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. या जखमींवर सध्या उपचार सूरू आहेत. तसेच जखमीची संख्या वाढणार असल्याचे समजताच जिल्हा रुग्णालयातील सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांना तत्काळ अलर्ट करण्यात आले होते.
advertisement
दरम्यान हायवेवर धोक्याचे वळण असल्या कारणाने हा अपघात होत असल्याचा आरोप होत आहे.त्यामुळे अपघात रोखण्यासाठी या वळणावर उपाय करावा, अशी मागणी जोर धरते आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Accident : अंत्यविधी सुरू असताना पिकअप गर्दीत घुसला, एकाचा जागीच मृत्यू तर 10 जण गंभीर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement