Post Office Scheme: फक्त एकच अट आणि 115 महिन्यात पैसे डबल! Post Office ची सर्वात बेस्ट स्कीम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसची सुरक्षित योजना असून ७.५ टक्के व्याजदराने ११५ महिन्यांत गुंतवलेली रक्कम दुप्पट होते. सिंगल आणि जॉइंट खाते, नॉमिनी सुविधा उपलब्ध.
आपल्या कमाईतील काही हिस्सा बाजूला ठेवून चांगले रिटर्न्स आणि भविष्याची तरतूद व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय हवे असतात. आज आम्ही तुम्हाला एक उत्तम पर्याय सांगणार आहोत. याच कारणामुळे भारतात पोस्ट ऑफिसच्या योजना नेहमीच लोकप्रिय ठरल्या आहेत. अशा दमदार योजनांमध्ये किसान विकास पत्र KVP स्कीम सध्या चर्चेत आली आहे. या योजनेत केवळ आकर्षक व्याजदर आणि तुमचे गुंतवलेले पैसे अवघ्या ११५ महिन्यांमध्ये, म्हणजे ९ वर्षं आणि ७ महिन्यांत दुप्पट होतात.
advertisement
पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे पूर्णपणे सुरक्षित आहे. कारण तुमच्या पैशाच्या सुरक्षिततेची हमी स्वतः केंद्र सरकार देते. त्यामुळे, ज्यांना बाजारातील चढ-उतारांची भीती वाटते आणि सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य द्यायचे आहे, त्यांच्यासाठी किसान विकास पत्र ही योजना अत्यंत विश्वासार्ह पर्याय आहे.
advertisement
या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळतो आणि तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी निश्चित असा ९ वर्षं ७ महिन्यांचा (११५ महिने) कालावधी लागतो. पोस्‍ट ऑफिस KVP योजनेत सध्या वार्षिक ७.५ टक्के दराने व्याज मिळत आहे. या योजनेत तुम्हाला एकाच वेळी एकरकमी गुंतवणूक करावी लागते. हे लक्षात ठेवा की, सरकारी योजनांच्या व्याजदरात दर तीन महिन्यांनी बदल केला जातो.
advertisement
advertisement
किसान विकास पत्र योजनेत पैसे दुप्पट कसे होतात आणि त्यामागे कोणते गणित काम करते, हे आपण एका उदाहरणातून समजून घेऊया. समजा, तुम्ही या योजनेत १ लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली. सरकारकडून मिळणाऱ्या ७.५% वार्षिक चक्रवाढ व्याजानुसार, पहिल्या वर्षाच्या शेवटी तुम्हाला ७,५०० रुपये व्याज मिळेल. ही रक्कम मूळ रकमेत जमा होते. त्यामुळे दुसऱ्या वर्षी तुम्हाला १ लाख ७ हजार ५०० रुपयांवर ७.५% व्याज मिळेल, जे ८,०६२ रुपये होईल.
advertisement
advertisement
पोस्ट ऑफिसच्या या किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला सिंगल आणि जॉइंट अशा दोन्ही प्रकारची खाती उघडण्याची सुविधा मिळते. विशेष म्हणजे, एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन व्यक्ती एकत्र गुंतवणूक करू शकतात. या योजनेत गुंतवणूक करताना नॉमिनी जोडणे आवश्यक आहे, जेणेकरून वारसाला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. तसेच, गुंतवणूकदारांना गरजेनुसार अडीच वर्षांनंतर (३० महिने) आपले खाते बंद करून पैसे काढण्याची सुविधा देखील दिली जाते.


