Success Story: कामगार बनला मालक, लायटिंग व्यवसायातून वर्षाला 40 लाखांची उलाढाल, कसं मिळवलं यश?

Last Updated:
Business Story: कष्ट आणि सातत्य ठेवल्यास कोणताही व्यवसाय यशस्वी करता येतो, हे रुपशने दाखवून दिलं आहे.
1/7
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील लोहार चाळ हे लायटिंग साहित्य खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक पिढ्यांपासून लायटिंगचा मोठा व्यवसाय चालतो.

advertisement
2/7
प्रचंड गर्दी असलेल्या या बाजारात 27 वर्षांचा रुपेश साबळे हा तरुण स्वतःचा व्यवसाय चालवतो. साताऱ्यातील एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या या तरुणाने कमी पगारावर काम सुरू केलं होतं. आता मात्र, तो लाखो रुपयांची उलाढाल करणारा व्यापारी बनला आहे.

3/7
साताऱ्यातील पाटण तालुक्यात एका खेडे गावात रुपेशचा जन्म झाला होता. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर रोजगारासाठी तो मुंबईला आला. सुरुवातीला त्याने चुलत्यांच्या लायटिंग दुकानात काम केलं. तेव्हा त्याला सहा हजार रुपये पगार मिळत होता. काम करताना त्याला या व्यवसायाची आवड निर्माण झाली. ग्राहक काय मागतात, लाइट्सचे प्रकार कोणते, त्यांचा दर्जा, नफा-तोट्याचं गणित, हे सगळं त्याने नीट समजून घेतलं.

4/7
काही वर्षांचा अनुभव मिळाल्यानंतर रुपेशने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. लोहार चाळीत त्याने एका छोट्या गाड्यावर (हातगाडी) लायटिंग विकायला सुरुवात केली. गाड्याचं भाडं तब्बल 17 हजार रुपये होतं. जबाबदारी मोठी होती, पण मेहनतीच्या जोरावर त्याने व्यवसाय टिकवून ठेवला.

5/7
गाड्यावर विक्री करताना रुपेशने ग्राहकांशी विश्वासाचं नातं निर्माण केलं. त्याच्या प्रामाणिक व्यवहारामुळे आणि दर्जेदार लायटिंग साहित्यामुळे ग्राहक परत परत त्याच्याकडे येऊ लागले. काही वर्षांनी त्याने पुढे पाऊल टाकत लोहार चाळीतच स्वतःचा गाळा विकत घेतला.

6/7
सुरुवातीला रुपेशचा व्यवसाय रिटेल स्वरूपात चालत होता. नंतर त्याने होलसेल विक्री सुरू केली आणि व्यवसायाचा अधिक विस्तार केला. रुपेशच्या या प्रवासात त्याचं कुटुंबही त्याच्यासोबत उभं राहिलं. वडील आणि भाऊ गावाहून मुंबईत येऊन त्याच्या व्यवसायात मदत करत आहेत. सध्या रुपेशकडे विविध प्रकारचे लाइट्स, घरगुती सजावटीपासून ते कमर्शिअल वापरासाठी लागणारं साहित्य उपलब्ध आहे.

7/7
आठ वर्षांपूर्वी एका गाड्यापासून सुरू झालेला रुपेश हा प्रवास आता स्वतःच्या गाळ्यापर्यंत पोहोचला आहे. रुपेश साबळे लायटिंगच्या व्यवसायातून सध्या वर्षाला 30 ते 40 लाखांची उलाढाल करतो. कष्ट आणि सातत्य ठेवल्यास कोणताही व्यवसाय करता येतो, हे रुपशने दाखवून दिलं आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement