नारायण मूर्तींनी 4 महिन्यांच्या नातवाला दिले 15 लाख शेअर्स, पाळण्यात बसल्या बसल्या कसा मिळाला 3.3 कोटींचा डिव्हिडंट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा नातू एकाग्र, १७ महिन्यांत ३.३ कोटींचा मालक झाला आहे. नारायण मूर्ती यांनी त्याला १५ लाख शेअर्स दिले होते.
एखाद्याचं नशीब त्याच्या पाळण्यातच उजळतं, हे खरं आहे! इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा दीड वर्षाचा नातू 'एकाग्र' अवघ्या १७ महिन्यांत कोट्यवधींचा मालक झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इन्फोसिसच्या तिमाही निकालांमध्ये मिळालेल्या लाभांशामुळे एकाग्रला तब्बल ३.३ कोटी रुपयांचा धनवर्षाव झाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मूर्ती कुटुंबातील इतर अनेक सदस्य- जे इन्फोसिसच्या प्रवर्तक गटाचे सदस्य आहेत. त्यांनाही लाभांशातून चांगली रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये खुद्द नारायण मूर्ती यांना 33.3 कोटी रुपये मिळतील. तर त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांना 76 कोटी आणि मुलगी अक्षता मूर्ती यांना 85.71 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.