Thane 5 Best Vada Pav: ठाण्यातले 'हे' 5 बेस्ट वडापाव, तुमचा फेव्हरेट कोणता?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
फक्त मुंबईतच नाही तर मुंबई उपनगरातही वडापावाचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. मुंबई नजीक असलेल्या ठाण्यात तुम्हाला अनेक वडापाव चाखायला मिळेल. कोणकोणते वडापाव आहेत? कोणकोणत्या प्रसिद्ध वडापावच्या चव तुम्हाला चाखायला मिळतील? जाणून घेऊया...
advertisement
advertisement
ठाणेकरांसाठी नौपाड्यातील गजानन वडापाव हे नाव फार प्रसिद्ध आहे. इथे वडापावसोबत पिवळी पातळ चटणी आणि ठेचा दिला जातो. इथे कधीही गेलात तरी तुम्हाला गरम वडाच मिळतो. वडापावसाठी इथे खवय्यांची रांग लागलेली असते. इथली कांदा तसेच बटाटा भजीदेखील फेमस आहेत. सकाळी 7:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही जाऊन भेट देऊ शकता.
advertisement
ठाणे रेल्वे स्टेशनजवळील राजमाता वडापाव सेंटरला ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. इथे वडापावसोबत मिळणारी पिवळी चटणी फारच वेगळी आहे. या चटणीची टेस्टही वेगळी आणि सुंदर आहे. इथेही कायम गरमागरम वडे मिळतात. वड्यांसोबत इथला समोसाही प्रसिद्ध आहे. ठाणे पश्चिममध्ये घंटाळी येथे राम मारुती रोडवर असणाऱ्या श्रीधर बिल्डिंगच्या इथे राजमाता वडापाव सेंटर आहे. सकाळी 7:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही जाऊन भेट देऊ शकता.
advertisement
कुंजविहार ठाण्यातील जुन्या आणि प्रसिद्ध वडापाव मिळणाऱ्या ठाण्यातील ठिकाणांपैकी एक आहे. कुंजविहारचा जम्बो वडापाव प्रसिद्ध आहे. एक वडापाव खाल्ला की जेवलं नाही तरी चालेल इतका मोठा वडापाव आहे, जम्बो वडापाव म्हणजेच कुंजविहारची खासियत आहे. लाल लसणाची चटणी आणि तळलेल्या ठसकेदार मिरच्या तोंडीला असल्या की या वडापावची चव भन्नाट लागते. ठाणे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असल्याने इथेही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. सकाळी 8:00 ते रात्री 10:00 वेळेत तुम्ही केव्हाही दुकानाला भेट देऊ शकता.
advertisement
दिवसेंदिवस वडापावच्या आधुनिक प्रकारांची संख्या वाढली आहे. त्यापैकीच एक फेमस प्रकार म्हणजे, तंदूरी वडापाव... ठाण्यातील अष्टविनायक कट्टा इथला तंदूरी वडापाव भन्नाट आहे. तंदूरी ग्रिलवर वडा भाजला जातो त्यावर बार्बेक्यू सॉस आणि चुरा टाकला जातो. मग त्यानंतर पावात भरून तो ग्राहकांना दिला जातो. घास घेण्यासाठी वडापाव तोंडाजवळ येताच एक मस्त स्मोकी स्मेल येतो. ठाणे पूर्वेतील अष्टविनायक चौकात असणाऱ्या राजलक्ष्मण सोसायटीच्या इथे तंदूरी वडापाव खायला मिळेल. दुपारी 12:00 ते रात्री 10:00 या वेळेमध्ये वडापावाचे दुकान सुरू असतं.
advertisement
रुची वडापाव हा लहानसा वडापाव जॉईंट आहे. हा जॉईंट छोटा आहे पण स्वच्छता आणि टापटीप ही इथली खासियत आहे. वडापावबद्दल बोलायचे झाल्यास पावाला लाल चटणी, ठेचा चोपडला जातो वड्यासोबत चुराही पावामध्ये सारला जातो. या वडापावची चव युनिक आहे. ठाणे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये या वडापावाचा स्टॉल आहे. दुपारी 4:00 ते रात्री 9:00 या वेळेत जाऊन तुम्ही वडापाव खाऊ शकता.


