फोडाफोडीचं लोण संभाजीनगरात, भाजपने पुन्हा डाव टाकला, निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांना झटका

Last Updated:

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यावरून जोरदार वाद सूरू आहेत.

bjp vs shiv sena
bjp vs shiv sena
Chhtrapati Sambhaji Nagar News : अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यावरून जोरदार वाद सूरू आहेत.या वादाची तक्रार एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी जाऊन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. पण या घडामोडीनंतर फोडाफोडी काय थांबेना झाली आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसला आहे. हा झटका त्यांना महायुतीतील सहकारी पक्ष भाजपने दिला आहे.त्यामुळे स्थानिक पातळीवर नेमकं काय राजकारण झालं आहे. हे जाणून घेऊयात.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका सूरू झाल्यापासून पक्षातील उमेदवारांना आणि नेत्यांना फोडण्याचे सत्र सुरू झाले आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना फोडण्याचे अनेक प्रकार घडले होते. विशेष म्हणजे हे प्रकार एकनाथ शिंदे यांच्याच बालेकिल्ल्यात घडले आहेत.त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याची भेट घेऊन तक्रार केली होती. या तक्रारीनंतर फोडाफोडी थांबायचं नाव घेत नाही आहे.कारण आता पुन्हा संभाजीनगरमध्ये भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नेता फोडला आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने आता एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेविका शिल्पा राणी वाडकर यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करून घेतला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते वाडकर यांनी भाजपा प्रवेश केला होता. शिल्पा वाडकर यांच्यासोबत दहा महिला कार्यकर्त्यांनी आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होणार आहे.तसेय या घटनेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.
advertisement
मी आधीपासूनच संघ परिवाराच्या विचाराने प्रेरीत आहे आणि त्याच विचारांवर मी आजपर्यंत काम करत आली आहे.शिवसेनेत असताना देखील मी याच विचाराने काम करत होती. पण आता मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काम करणे कंन्फर्मेटेबल वाटल्याने मी हा प्रवेश केला आहे,असे शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या शिल्पा वाडकर यांनी सांगितले.
advertisement
माजी नगरसेविका शिल्पा वाडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिला होता. या दरम्यान इतर पक्ष त्यांना पक्षात घेण्यासाठी इच्छुक होते.पण त्यांच काम चांगलं आहे, ते पाहता असा कार्यकर्ता महायुती बाहेर जाऊन नये यासाठी आम्ही त्यांना आज भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे,अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/Local Body Elections/
फोडाफोडीचं लोण संभाजीनगरात, भाजपने पुन्हा डाव टाकला, निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांना झटका
Next Article
advertisement
'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
गौरीने वडिलांना फोटो पाठवले, कुटुंबावर आभाळ कोसळलं! मेसेजमध्ये होतं काय?
  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

View All
advertisement