Mumbai Weather: महिन्याच्या पहिल्याच दिवशी बदलली हवा, कोकणात धो धो, मुंबई, ठाण्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: गेल्या काही दिवसांत मुंबईसह कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. आता हवामानात मोठे बदल जाणवत असून पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
राज्यात मान्सूनचा जोर कायम आहे. मुंबईसह कोकणात पावसाचं धुमशान सुरू आहे. आज जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरणार आहे. आज हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर कोकणात जोरदार पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
आज मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असून, दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अनुभव येऊ शकतो. सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता कमी असली, तरी नागरिकांना सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे. आजचे तापमान 30°C कमाल आणि 27°C किमान असेल.आजचे तापमान 30°C कमाल आणि 27°C किमान असेल.
advertisement
पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरलेला होता. पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले होते, शेतशिवारातठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांत आज ढगाळ वातावरण राहणार असून, दुपारनंतर हलक्यापासून मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. विशेषतः संध्याकाळच्या सुमारास ठाणे पूर्व, कळवा, मुंब्रा तसेच नवी मुंबईतील घणसोली, कोपरखैरणे, वाशी, बेलापूर परिसरात विजांच्या गडगडाटासह पाऊस होऊ शकतो. ओलावा वाढलेला असून काही ठिकाणी शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 जुलै 2025 रोजी पालघरमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळपासून वातावरण ढगाळ असून, दुपारनंतर व संध्याकाळी काही भागांत जोरदार सरी कोसळू शकतात.
advertisement
पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरलेला होता. पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले होते, शेतशिवारात ओलावा वाढलेला असून काही ठिकाणी शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. पालघरमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळपासून वातावरण ढगाळ असून, दुपारनंतर व संध्याकाळी काही भागांत जोरदार सरी कोसळू शकतात.
advertisement